शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

विद्यापीठांमधील अधिष्ठातांच्या नियुक्त्या रखडल्या; राजभवनाकडून मुलाखतीसाठी प्रतिनिधी मिळेना

By राम शिनगारे | Updated: July 5, 2025 15:58 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अधिष्ठातांसह सर्वच संवैधानिक पदासाठी जाहिरात दिलेली आहे.

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील बहुतांश सार्वजनिक विद्यापीठांमधील अधिष्ठातांच्या मुलाखती रखडल्या आहेत. मुलाखती घेण्यासाठी आवश्यक असलेला राज्यपाल तथा कुलपती यांचा प्रतिनिधी देण्यात आलेला नसल्यामुळे ही प्रक्रियाच खोळंबली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानेही कुलपतींचा प्रतिनिधी मिळावा, यासाठी पुन्हा एकदा राजभवनाशी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अधिष्ठातांसह इतर संवैधानिक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या रखडल्याचा थेट परिणाम विद्यापीठाच्या एकूण शैक्षणिक कामगिरी होत असल्याची बाबही समोर आली आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ नुसार शैक्षणिक निर्णय घेण्याचे अधिकार चार विद्याशाखांच्या अधिष्ठाता मंडळाला दिलेले आहेत. कुलगुरूंची नियुक्ती झाल्यानंतर अधिष्ठातांची रीतसर नियुक्ती करण्याचे अधिकार कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालील समितीला दिलेले आहे. त्या समितीमध्ये कुलपती तथा राज्यपालांच्या प्रतिनिधीचाही समावेश असतो. समितीचा कोरम पूर्ण झाल्यानंतरच अधिष्ठातांसह इतर संवैधानिक अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अधिष्ठातांसह सर्वच संवैधानिक पदासाठी जाहिरात दिलेली आहे. त्यात कुलसचिव आणि परीक्षा संचालकपदाच्या मुलाखती घेण्यासाठी राजभवनाकडून कुलपतींचा प्रतिनिधी देण्यात आला. मात्र, उर्वरित पदांसाठी प्रतिनिधी देण्यात येत नाही. हीच परिस्थिती राज्यातील इतर विद्यापीठांची असल्याची माहितीही समोर आलेली आहे. अधिष्ठातांच्या रखडलेल्या नियुक्त्यांमुळे सर्वच ठिकाणचा कारभार प्रभारींवर सुरू आहे.

प्राध्यापक भरतीसाठी दिशाच मिळेनाडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोळा वर्षांनंतर प्राध्यापक भरती होत आहे. या भरती प्रक्रियेत एकूण ७३ जागांसाठी तब्बल ५०२६ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. विद्यापीठात प्राध्यापकांच्या २८९ जागा मंजूर आहेत. त्यातील १२५ पेक्षा कमी प्राध्यापक सध्या कार्यरत आहेत. रिक्त पदांपैकी ७३ पदे भरण्यास उच्च शिक्षण विभागाने ७ ऑगस्ट २०१९ रोजी मान्यता दिली होती. त्यानुसार सप्टेंबर २०२३ मध्ये या भरतीसाठी अर्जही मागविले. मात्र, काही सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतल्याने त्यावेळी राजभवनकडून भरती प्रक्रिया स्थगिती दिली होती. त्यानंतर कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत ७३ जागा भरण्यास मान्यता मिळवली. त्यानुसार २ एप्रिल ते २ मे दरम्यान, ऑनलाईन अर्ज मागितले. त्यासही आता दोन महिने उलटून गेले तरी अर्जांची छाननी झालेली नाही. त्यासाठी राजभवनाकडून कोणत्याही सूचना मिळालेल्या नसल्यामुळे संपूर्ण प्रक्रियाच ठप्प झालेली आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र