शहरं
Join us  
Trending Stories
1
निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

गरज नसतानाही कर्मचारी पाठवले, तेही अपात्र; 'रोहयो' विभागातील कंत्राटी भरती संशयास्पद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 18:06 IST

छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात अशाच पध्दतीने कंत्राटी कर्मचारी भरती केल्याचा संशय बळावला आहे.

छत्रपती संभाजीनगर : रोहयो विभागात मागील काही वर्षांत कंत्राटी पद्धतीने केलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या संशयास्पद असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे आदेश मुंबई लेखा परीक्षा विभागाचे प्रधान महालेखापालांनी रोहयो उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील २१६ कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची उलटतपासणी होणार आहे. छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात अशाच पध्दतीने कंत्राटी कर्मचारी भरती केल्याचा संशय बळावला आहे.

२०२३ ते २०२४ या काळात राज्यात रोहयो विभागांत विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने ३ हजार कर्मचाऱ्यांच्या भरतीचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिले होते. पात्रता नसताना आणि बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र सादर करून उमेदवारांना नियुक्ती दिल्याच्या तक्रारींचे पेव फुटल्यानंतर राज्यभर रोहयोच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी सुरू झाली. यात छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, पालघर, धाराशिव, अहिल्यानगर यांसह ज्या ठिकाणी दिलेल्या नियुक्त्या संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मार्च २०२४ पासून आतापर्यंत एस-२ या कंपनीने सहायक कार्यक्रम अधिकारी १०, तांत्रिक सहायक ३४, लिपीक-संगणक परिचालक ४६, शिपाई ३ अशी ९३ पदे भरली. प्रधान लेखापालांच्या आदेशानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी होणार आहे. २०१० पासून आजपर्यंत २१६ कंत्राटी कर्मचारी विभागात भरले. त्यांच्याही कागदपत्रांची तपासणी होणार आहे.

मंत्रालयातून येत आदेश...कर्मचाऱ्यांची गरज नाही, असे वारंवार पत्र देऊनही पाठविलेले कर्मचारी रुजू करून घेण्याचे आदेश येत असत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाचा नाईलाज होत असे. अनेकांना दिलेले काम करता येत नाही, तरी त्यांना सांभाळले जात आहे. प्रशासनाने एक चालक व लिपिक अपात्र असल्याचे दिसताच त्यांना रूजू करून घेतले नाही.

आठवड्यात तपासणी पूर्ण होईलप्रधान लेखापालांच्या पत्रानुसार जिल्ह्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी होईल. नोटिसा देऊन कागदपत्र तपासणीसाठी हजर राहण्यास सांगितले जाईल. तपासणीला आठवड्याचा कालावधी लागेल. तपासणीचा अहवाल शासनाला पाठवू.- उमाकांत पारधी, उपजिल्हाधिकारी, रोहयो

टॅग्स :Marathwadaमराठवाडाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरState Governmentराज्य सरकार