शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

APMC Election: बीजेपीला सोडत भुमरे एकटे लढले, महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 20:16 IST

पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीला खातेही उघडता आले नाही

पैठण:  पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले वर्चस्व कायम राखत रोहयो तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या पॅनलने सर्वच्यासर्व १८ जागा जिंकत महाविकास आघाडीच्या पॅनलचा धुव्वा उडवला. तालुक्यातील सोसायटी व ग्रामपंचायतवर भुमरे यांचे वर्चस्व असताना देखील महाविकास आघाडीने पॅनल उभा केल्याने निकालाची उत्सुकता लागली होती. परंतु मंत्री संदीपान भुमरे यांनी दणदणीत विजय मिळवून तालुक्यावर असलेले वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले आहे. 

पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठीची मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी अनील पुरी व सहाय्यक अधिकारी नितीन वीखे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी पंचायत समितीच्या सभागृहात करण्यात आली. पहिल्या फेरीपासून मंत्री संदीपान भुमरे यांच्या शिवशाही शेतकरी विकास पँनलच्या उमेदवारांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी, हमाल मापाडी मतदार संघातील सर्वच्या सर्व १८ उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले. 

मतमोजणी नुसार राम ऐरंडे, संभाजी तवार, राजेंद्र तांबे, विठ्ठल दोरखे, शरद नरके, बद्रीनाथ बोंबले, सुभाष मुळे, गंगासागर घनवट, शशिकला हजारे, शिवाजी जाधव, साईनाथ होरकटे, हे सोसायटी मतदार संघातून विजयी झाले. ग्रामपंचायत मतदार संघातून राजूनाना भुमरे, सचिन मोगल, मनिषा खराद, कारके भगवान हे विजयी झाले. व्यापारी मतदार संघातून मुकेश काला, व महेश मुंदडा तर हमाल मापाडी मतदार संघातून राजू उत्तमराव टेकाळे हे विजयी झाले. पॅनलच्या दणदणीत विजयानंतर पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत जि प सभापती विलास भुमरे, रवींद्र काळे, विनोद बोंबले, रवींद्र शिसोदे, राजेंद्र शिसोदे,  नामदेव खराद, शिवराज भुमरे, राजू भुमरे, शेखर शिंदे, राजू टेकाळे, किशोर चौधरी, भूषण कावसानकर, सुनील हिंगे, नंदलाल काळे, दादा बारे, अण्णासाहेब लबडे, शहादेव लोहारे, संतोष सव्वाशे, संभाजी सव्वासे, गणेश मडके, किशोर तावरे, ईश्वर दगडे, सोमनाथ परळकर, बाबुराव पडुळे, राजू गायकवाड, जालिंदर आडसुळ, संजय कस्तुरे, विष्णू मिटकर आदीसह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.

टॅग्स :APMC Electionकृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकAurangabadऔरंगाबादSandipan Bhumreसंदीपान भुमरे