शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

भुकेने व्याकुळ बिबट्याचा अन्य वन्यप्राण्यांसोबतच्या संघर्षात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 11:40 IST

बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर दौलताबाद नर्सरीत वनविभाग तसेच पशुवैद्यकीय विभागाच्या उपस्थितीत इन कॅमेरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

औरंगाबाद : पळशी शामवाडी शिवारात वनविभागाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी पकडलेला बिबट्या गंभीर जखमी झाल्याने गुरुवारी रात्रीच मृत्युमुखी पडला. हा बिबट्या वन्यप्राण्याच्या संघर्षात अगोदर गंभीर जखमी झालेला होता. त्याच्या अंगावर १० ते १२ गंभीर जखमा तपासणी व शवविच्छेदनात आढळून आल्या. शुक्रवारी दुपारी दौलताबाद नर्सरीत पशुवैद्यकीय अधिकारी तसेच वनविभागाने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

बिबट्या पळशी शामवाडी शिवारात जखमी किंवा आजारी अवस्थेत असल्याची माहिती मिळाल्यावरून खामगावचे वनरक्षक विजय राठोड, तसेच वनरक्षक पळशीचे वनरक्षक भाऊसाहेब भोसले यांनी ही माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती. मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर, उपवनसंरक्षक सूर्यकांत मंकावार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी दादा तौर, सहाय्यक वनसंरक्षक अरुण पाटील यांना व रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी पाठविण्यात आली. बिबट्या जखमी असल्याचे पूर्ण लक्षात आले. त्याच्यावर उपचार करणे गरजेचे आहे, त्याला पकडण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर यांची परवानगी मिळाल्यानंतरच वन्यप्राणी बिबट रेस्क्यू करून पुढील औषधोपचारासाठी दौलताबाद रोपवाटिका येथे पिंजऱ्यात टाकून घेऊन गेले. जखमी असलेला बिबट्याच्या उपचारासाठी प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. संजय गायकवाड औरंगाबाद यांच्याशी टीमने संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलाविले होते. त्यांनी पिंजऱ्यात त्याची तपासणी करून उपचार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

उपचारादरम्यान मृत्यू...इतर वन्यप्राण्यांसोबत झालेल्या झटापटीत बिबट्याचा गळा, बरगडी व अंगावर शिंग लागल्याने तो गंभीर जखमी झाला असावा, उपचारादरम्यान दौलताबाद याठिकाणी डॉ. गायकवाड यांनी तपासून अखेर बिबट्याला मृत घोषित केले, असे मानद सदस्य किशोर पाठक यांनी सांगितले. मृत्यू झाल्यानंतर रात्री त्याचे शवविच्छेदन करण्यात येत नसल्याने रात्रभर येथे कर्मचाऱ्यांना पहारा द्यावा लागला. त्यासाठी शहरातून बर्फाच्या दोन लाद्या आणून त्याचे मृत शरीर त्यावर सुरक्षित ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी पंचायत समिती औरंगाबादचे पशुधन विकास अधिकारी डॉ. भगत, त्यांच्या टीममधील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता इंगळे, पशुधन विकास अधिकारी माळीवाडा डॉ. सुरे, वनविभागाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत (दि.३ ) शुक्रवारी शवविच्छेदन करून येथेच त्याचे दहन करण्यात आले आहे. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवला असून प्रयोगशाळेत तो पाठविला जाणार आहे.

टॅग्स :leopardबिबट्याAurangabadऔरंगाबादforestजंगल