शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक कैदी पळाला, पण काही तासांतच सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 16:07 IST

या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून पोलीस ठाण्यात नोंद केली नाही.

औरंगाबाद : हर्सूल कारागृहातील पळून गेलेल्या दोन कैद्यांचा शोध लागलेला नसताना बुधवारी रात्री आणखी एका कैद्याने पलायन केले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर जेल पोलिसांनी गुरुवारी सकाळी  मिटमिटा परिसरात त्याला पकडले आणि पुन्हा  जेलमध्ये डांबले. या घटनेची वाच्यता होऊ नये म्हणून पोलीस ठाण्यात नोंद केली नाही.

याविषयी विश्वसनीय सूत्राने सांगितले की, अहमदनगर जिल्ह्यातील सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकल्याच्या गुन्ह्यासह  अन्य गंभीर गुन्हे असलेला भोसले नावाचा न्यायाधीन कैदी हर्सूल कारागृहात आहे. सध्या त्याला जळगाव रोडवरील एसबीओ शाळेतील प्रति जेलमध्ये ठेवले आहे. एसबीओए शाळेत तयार केलेल्या तात्पुरत्या जेलमध्ये सुमारे १५५ कैदी आहेत. बुधवारी रात्री पोलिसांची नजर चुकवून भोसलेने तेथून धूम ठोकली. जेलच्या नियमानुसार दर काही तासांनंतर कैद्यांची शिरगिनती केली जाते. मध्यरात्रीनंतर तेथील पोलिसांनी कैदी मोजले असता एक कैदी कमी दिसून आला. भोसले पळून गेल्याचे स्पष्ट झाले. त्याचे नातेवाईक पडेगाव, मिटमिटा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना होती. त्याचा शोध घेत असताना मिटमिटा येथे सकाळी तो पोलिसांच्या हाती लागला. याविषयी जेल अधीक्षक हिरालाल जाधव म्हणाले की, रात्री अशी घटना घडली नाही. शिवाय आमचे सर्व कैदी आमच्याजवळ आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादjailतुरुंगPoliceपोलिस