शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

विद्यापीठात आणखी एका इनक्युबेशन केंद्राला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 12:32 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून आठ कोटी रुपयांचे इनक्युबेशन केंद्र दोन दिवसांपूर्वी मंजूर झाल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

- राम शिनगारे  

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतून आठ कोटी रुपयांचे इनक्युबेशन केंद्र दोन दिवसांपूर्वी मंजूर झाल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. यात राज्यातील विविध शासकीय आणि खाजगी विद्यापीठांचा समावेश आहे. मराठवाड्यातून औरंगाबादच्या विद्यापीठाची निवड केली. यामुळे विद्यापीठात उभारण्यात येणारे हे दुसरे इनक्युबेशन केंद्र ठरणार आहे.

विद्यापीठात बजाज कंपनीने सामाजिक उत्तर दायित्व निधीतून (सीएसआर) इनक्युबेशन केंद्र उभारले आहे. या केंद्राचे नुकतेच उद्घाटन झाले असून, त्यातून कामकाजाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीतर्फे इनक्युबेशनसंदर्भात एक योजना सुरू केली आहे. या योजनेतून विद्यापीठाला इनक्युबेशन केंद्र मिळावे, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी महिनाभरापूर्वी झालेल्या बैठकीत सादर केला होता. यानंतर दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीला एनक्युबेशनच्या समन्वयक डॉ. भारती गवळी यांनी हजेरी लावली. त्यावेळी जाहीर केलेल्या यादीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे केंद्र आठ कोटींचे आहे. त्यात आणखी दोन कोटींची भर पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत होणार कार्यक्रमविद्यापीठासह राज्यातील इतर संस्थांना मंजूर झालेल्या इनक्युबेशन केंद्राच्या मंजुरीचे पत्र मुंबईत ३ आॅगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात मिळणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू, उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे आणि राज्याचे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रण विद्यापीठ प्रशासनाला मिळाले आहे.

‘स्टार्टअप इंडिया’ यात्रा निघणारस्टार्टअप इंडिया या योजनेच्या जनजागृतीसाठी ‘स्टार्टअप इंडिया महाराष्ट्र स्टेट’ ही यात्रा काढली जाणार आहे. ही यात्रा १५ आॅक्टोबर रोजी औरंगाबादेत येणार असून, १६ तारखेला बीड जिल्ह्यात असणार आहे. राज्यातील एकूण १४ जिल्ह्यांमध्ये ही यात्रा पोहोचणार आहे. यात समाजातील प्रत्येक घटकाला उपस्थित राहता येणार आहे. प्रत्येक ठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत प्रशिक्षण, कार्यशाळा घेण्यात येईल. यात सहभागी होणाऱ्यांना आपल्याकडे असणाऱ्या कल्पना, नावीन्यता मांडता येतील. त्यात सर्वोत्कृष्ट ठरलेल्यांचा स्टार्टअपसाठी विचार केला जाणार असल्याचेही समजते.

मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना फायदाविद्यापीठाला केंद्र आणि राज्य सरकारकडून एक इनक्युबेशन केंद्र मंजूर झाले आहे. या केंद्राचा फायदा मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे. त्या केंद्रातून विद्यार्थी ते उद्योजक असा प्रवास घडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.- डॉ. अशोक तेजनकर, प्रकुलगुरू

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारEducationशिक्षणfundsनिधी