शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा चुरस! शिंदेसेना, उद्धवसेना उतरणार मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 19:30 IST

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना निवडणूक विभागाने जारी केली. तेव्हापासून सर्वच राजकीय पक्षांकडून पदवीधर मतदारसंघासाठी चाचपणी सुरू केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : आगामी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या मतदारसंघाच्या मैदानात महाविकास आघाडीचा घटक पक्ष उद्धवसेना आणि महायुतीचा घटक पक्ष असलेला शिंदेसेना हा पक्ष उतरणार असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षांनी पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना निवडणूक विभागाने जारी केली. तेव्हापासून सर्वच राजकीय पक्षांकडून पदवीधर मतदारसंघासाठी चाचपणी सुरू केली आहे. पुढील वर्षी ही निवडणूक होणार आहे. असे असले तरी या मतदारसंघासाठी नव्याने मतदार नोंदणी करावी लागते. यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांकडून मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. मागील पंधरा वर्षांपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमदेवार निवडून येत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट झाले आहेत. शिवाय दोन्ही गट परस्परविरोधी आघाडी आणि महायुतीचा घटक पक्ष आहेत. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला एक वर्ष बाकी असल्याने ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी होईल अथवा नाही, याविषयी सांगता येत नाही. मात्र, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अ.प.) मतदार नोंदणी सुरू केली आहे. 

निवडणूक लढविण्यासाठी अनेकांची इच्छाअशाच प्रकारे महायुतीतील शिंदेसेनेनेही मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी शहरात झाली. या बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी युती होईल अथवा नाही, हे नंतर पाहू. पण, शिंदेसेनेला पदवीधर मतदारसंघाची ताकद दाखवायची असल्याचे सांगितले. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मतदार नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले. उद्धवसेनेच्या युवासेना आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्याही याविषयावर सतत बैठका होत आहेत. पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी पक्षाकडे अनेकांनी इच्छा व्यक्त केल्याची चर्चा आहे. पक्षप्रमुखांनीही तयारीला लागा, असे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shiv Sena factions gear up for Marathwada graduate constituency battle.

Web Summary : Shiv Sena factions prepare for the Marathwada graduate constituency election. Both Shinde and Uddhav factions are mobilizing, registering voters, signaling a potential face-off despite alliance uncertainties. Election notification issued.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMarathwadaमराठवाडाElectionनिवडणूक 2024