शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक ! कोरोना चाचणीसाठी आलेल्या वृद्धेला झाडाखाली बसवून दिला ऑक्सिजन सपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 18:35 IST

वाळूजच्या गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा गलथान कारभार

ठळक मुद्देविलगीकरण कक्षात रिकाम्या खाटा असताना वृद्धेवर झाडाखाली उपचारअनवधानाने या वृद्धेला झाडाखालीच सिलिंडर लावल्याची आरोग्य खात्याची कबुली.

वाळूज महानगर (औरंगाबाद ) :  कोरोना विषाणू संसर्गाची चाचणी करण्यासाठी आलेल्या ६५ वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने खाटा रिकाम्या असतानाही विलगीकरण केंद्राबाहेर झाडाखाली तिला आॅक्सिजन सिलिंडर लावल्याचा गंभीर प्रकार शनिवारी दुपारी वाळूजच्या गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये घडला. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या अमानवीय कृत्याबद्दल कोरोना चाचणीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

आरोग्य विभागाच्या वतीने वाळूजच्या गरवारे कम्युनिटी सभागृहात दोन महिन्यांपूर्वी नागरिकांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील व्यक्ती व इतरांना या सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यासाठी जवळपास ५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या केंद्रामध्ये आवश्यक सुविधा नसल्याने केंद्र बंद करून तेथे केवळ संशयितांचे स्वॅब घेण्यात येत आहेत.कमळापूर परिसरातील वृद्ध महिला शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास सुनेसोबत वाळूजच्या गरवारे सेंटरमध्ये स्वॅब देण्यासाठी आली होती.

दरम्यान, वृद्धेला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे तिने सुनेला सांगितले. त्यानंतर तात्काळ उपचार करण्याची विनवणी सुनेने आरोग्य कर्मचाऱ्यांना केली. आरोग्य सेवक-सेविका, लॅब टेक्निशियन, आशा कार्यकर्त्या आदी मदतीसाठी गेले. मात्र, केंद्रात ५० खाटा रिकाम्या असतानाही या कर्मचाऱ्यांनी वृद्धेला बाहेर चक्क झाडाखालीच आॅक्सिजनचे सिलिंडर लावले. यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र, १०८ रुग्णवाहिका न आल्याने तासाभरानंतर दुसरी रुग्णवाहिका बोलावून या वृद्धेला गंगापूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभारामुळे या वृद्धेची हेळसांड झाली. कोरोना चाचणीसाठी आलेल्या नागरिकांनी आरोग्य विभागाच्या या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.  

महिलेचा अँटिजन टेस्टचा अहवाल निगेटिव्हवाळूज येथे आॅक्सिजन सिलिंडरसह झाडाखाली बसविलेल्या महिलेला घाटीत दाखल करण्यात आले. याठिकाणी दाखल झाल्यानंतर महिलेची कोरोनाच्या निदानासाठी अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्या टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती घाटीेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी दिली.

आरोग्य विभागाकडून सारवासारवतालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेश कांबळे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सदरील महिला वृद्ध असल्यामुळे तिला चांगले उपचार मिळावेत यासाठी गंगापूर रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगितले, तर नोडल अधिकारी डॉ. उज्ज्वल चव्हाण यांनी गरवारे कम्युनिटी सेंटरमध्ये नवीन कर्मचारी आल्यामुळे अनवधानाने या वृद्धेला झाडाखालीच सिलिंडर लावल्याची कबुली दिली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद