शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे मराठवाड्यातील ३६ हजार जणांना २,८७२ कोटींचे कर्जवाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 15:52 IST

Annasaheb Patil Mahamandal: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळामुळे बेरोजगारांना व्यवसायाच्या संधी

छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजातील बेरोजगार तरुण, तरुणींनी नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा उद्योग- व्यवसाय करावा, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने बिनव्याजी कर्ज देण्यात येते. महामंडळाच्या या योजनेंतर्गत मराठवाड्यातील तब्बल ३६ हजार १७८ जणांनी तब्बल २,८७२ कोटी ५६ लाख रुपये कर्ज घेऊन स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरू करीत आदर्श निर्माण केला आहे.

राज्यात विविध समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळ आहे. याच धर्तीवर सन २०१८ साली राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाची स्थापना केली. या महामंडळाच्या वतीने मराठा समाजातील गरजूंना उद्योग, व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते. महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर महामंडळाच्या कर्ज परतावा योजनेसाठी अर्जदार पात्र असल्याचे पत्र देण्यात येते. या पत्रासह अर्जदाराने बँकेकडे कर्ज प्रस्ताव करावा लागतो. अर्जदाराने बँकेच्या कर्जाचा हप्ता अदा केल्यानंतर त्याच्या खात्यात व्याजाची रक्कम महामंडळाकडून जमा करण्यात येते. महामंडळाच्या या वैयक्तिक कर्ज योजनेंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील ६४ हजार ६४१ अर्जदार पात्र ठरले होते. यापैकी राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांनी ३६ हजार १७८ जणांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करीत त्यांच्या प्रकल्पासाठी २ हजार ८७२ कोटी ५६ लाख रुपये कर्जवाटप केले. या कर्जाचे नियमित हप्ते भरून परतफेड करणाऱ्या कर्जदार लाभार्थ्यांना २८६ कोटी ९४ लाख रुपये परतावा दिल्याची माहिती महामंडळाचे विभागीय समन्वयक प्रवीण अगवणे यांनी दिली.

१,५८३ प्रकरणे बँकेकडे मंजुरीविना पडूनमहामंडळाने मंजूर केलेले १,५८३ जणांचे कर्ज प्रस्ताव मराठवाड्यातील विविध बँकांकडे प्रलंबित आहेत. मागील वर्षभरात बँकांनी हे प्रस्ताव फेटाळलेले नाहीत. यामुळे या अर्जदारांचा उद्योग, व्यवसाय बँकेच्या निर्णयावर अवलंबून आहे.

५४१ जणांना नाकारले कर्जअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेसाठी पात्र असलेल्या ५४१ जणांचे कर्ज प्रस्ताव बँकांनी नाकारले आहेत. बऱ्याचदा कर्ज प्रस्ताव का नाकारत आहे, याचे कारणही बँकांकडून अर्जदारांना दिले जात नाही.

जिल्ह्याचे नाव --- लाभार्थी संख्या---- कर्जवाटप (कोटीमध्ये) छत्रपती संभाजीनगर--१२,२६३----१,०३५ जालना---५,५२५----३८८ बीड---४,३१२----३,२८.३९ परभणी--- ५,१७१----११८.२८ लातूर--- ३,८४०----३४०.३३ धाराशिव--- ५,९६५----४७८.२२ नांदेड--- १,६७०----१२२ हिंगोली--- ९०५----६२.३४

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMarathwadaमराठवाडाAnnasaheb Patil Mahamandalअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ