शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

महामार्गांमुळे बेघर झालेले प्राणी-पक्षी सैरभैर; मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 16:21 IST

विकास कामे पशू-पक्ष्यांच्या मुळावर आली आहेत

ठळक मुद्देसृष्टी संवर्धन संस्थेने मागच्या अडीच वर्षांत ५७२ पक्ष्यांची सुटका करून त्यांच्यावर उपचार केलेकोल्हे, लांडगे, तरस हे सहसा लवकर न दिसणारे प्राणी शहराच्या परिसरात दिसून येत आहेत

औरंगाबाद : धुळे-सोलापूर महामार्ग, समृद्धी महामार्ग, औरंगाबाद-पुणे रस्त्याचे रुंदीकरण यात प्रचंड  वृक्षतोड झाली असून, अनेक वन्यजीवांचा अधिवास नष्ट झाला आहे. यामुळे बिबट्यासह इतर प्राण्यांचे  मानवी वस्तीत येणे, आता मानवाची चिंता वाढविणारे ठरत आहे. विकास कामे पशू-पक्ष्यांच्या मुळावर आली असून, बेघर झालेले प्राणी-पक्षी सैरभैर झाले आहेत. २०१८ नंतर हे प्रमाण प्रकर्षाने वाढले असल्याचे वन्यजीव  अभ्यासकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

याविषयी सृष्टी संवर्धन संस्थेचे डॉ. किशोर पाठक म्हणाले की, दरवर्षी २ ते ४ अजगर पकडले  जायचे. २०१८ नंतर ते प्रमाण १५ ते २० पर्यंत गेले आहे. यातील ७ ते ८ अजगर शेततळ्यात सापडले आहेत. विषारी-बिनविषारी साप सापडण्याचे प्रमाण २०१७ पर्यंत दरवर्षी ७५ ते ८० एवढे असायचे, ते प्रमाण आता १५० ते १७० एवढे झाले आहे. २०१७ पर्यंत जिल्ह्यात सांबर म्हणजेच स्पॉटेड डीअर दिसले नव्हते. ते अत्यंत दुर्मिळ मानले जातात. आता  अधिवास नष्ट झाल्याने खुलताबाद तालुक्यात आणि औरंगाबाद शहरात सातारा परिसरातील मानवी  वस्तीतही स्पॉटेड डीअर आढळून आले आणि कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होऊन मेले. काळवीट, हरिण  यांच्यावर  कुत्र्यांचा हल्ला होणेही आता नित्याचेच झाले असून, कोल्हे, लांडगेही दर महिन्यात आढळून येत आहेत. प्राणी-पक्षी संकटात सापडले असून, विकास कामे करताना या पशू-पक्ष्यांचीही पर्यायी व्यवस्था  करण्याची गरज प्रशासनाने प्रकर्षाने लक्षात घ्यावी, असे वन्यजीव प्रेमी सांगत आहेत. 

हस्तक्षेप करून आपलेच नुकसानसृष्टी संवर्धन संस्थेने मागच्या अडीच वर्षांत ५७२ पक्ष्यांची सुटका करून त्यांच्यावर उपचार केले आहेत. कोल्हे, लांडगे, तरस हे सहसा लवकर न दिसणारे प्राणी वाल्मी, विद्यापीठ, हिमायत बागेच्या मागील माळरान येथे दिसून येत आहेत. हे सर्व प्राणी-पक्षी परिपूर्ण परिसंस्था तयार करून सृष्टीचे अस्तित्व टिकवून ठेवत असतात. आपण त्यात हस्तक्षेप करून आपलेच नुकसान करीत आहोत.- डॉ. किशोर पाठक, वन्यजीव अभ्यासक व  पक्षीमित्र

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीforestजंगल