शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श पतसंस्थेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी अनिल मानकापे पोलिसांसमोर शरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 18:25 IST

१८ महिन्यांनंतर शरण; अटक झालेला सोळावा आरोपी

छत्रपती संभाजीनगर : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील २०२ कोटींच्या घोटाळ्यात पसार अंबादास मानकापेचा मुलगा अनिल मानकापे याने १८ महिन्यांनंतर अखेर पोलिसांसमोर शरणागती पत्करली. शुक्रवारी त्याला पोलिस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

१२ जुलै २०२३ रोजी अंबादास मानकापेच्या पतसंस्थेत २०२ कोटींचा घोटाळा उघडकीस आला. सिडको पोलिस ठाण्यात या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले. यात आतापर्यंत अंबादाससह त्याचा एक मुलगा, दोन सुनांसह १५ जणांना अटक करण्यात आली. ठेवीदारांनी यात रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडल्याने पोलिस प्रशासनासह गृह मंत्रालयानेदेखील याची गंभीर दाखल घेतली. ऑगस्ट २०२४ मध्ये शासनाने मानकापे व पतसंस्थेच्या ५६.१८ कोटींच्या ४६ संपत्तीच्या लिलावला परवानगी दिली होती.

एकूण पाच गुन्हे दाखलपहिल्या गुन्ह्यानंतर घोटाळ्याची व्याप्ती वाढत मानकापे व त्याच्या कुटुंबावर पाच गुन्हे दाखल झाले. पोलिस निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक मोसीन सय्यद, उपनिरीक्षक अशोक अवचार यांच्या पथकाने या प्रकरणी तपास केला. पुरवणी दोषारोपपत्रात मानकापेच्या आणखी काही संपत्तींचा समावेश करण्यात आला आहे.

पंढरपूर, तुळजापुराच्या मठांमध्ये मुक्काममानकापेच्या एका संपत्तीचा प्रकरणात अनिल अनेकदा शहरात येऊन गेला. तो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात रजिस्ट्रीसाठी येऊन गेल्याचादेखील आरोप करण्यात आला. मानकापेचा मुख्य बंगला शासनाने ताब्यात घेतल्याने त्याचे कुटुंब सध्या शहरात भाडेतत्त्वावरच्या घरात राहत आहे. गेली दीड वर्ष अनिल पंढरपूर, तुळजापूर परिसरातील मठामध्ये मुक्कामी होता. दरम्यान, अंबादासच्या दोन्ही सुनांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने सध्या त्या बाहेर आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfraudधोकेबाजी