शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

... अन् रंगांची कुपी झाली रिती...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 8:15 PM

चित्रकला एकच पण त्यातून प्रत्येकीचे स्वतंत्र परंतु सक्षम रूप प्रकर्षाने दिसून आले.

- रुचिका पालोदकर औरंगाबाद : अजिंठ्याच्या अजरामर कलाकृती, मुक्तपणे बागडल्याचा आभास निर्माण करणारी वारली चित्रे आणि निसर्गाच्या सौंदर्याची रंगांच्या माध्यमातून कागदावर केलेली प्रसन्न उधळण अशी कुंचल्यातून साकारलेली रंगांची अद्भुत दुनिया अनुभवण्याचा आनंद औरंगाबादकरांनी मागील आठवड्यात मालती आर्ट गॅलरी येथे आयोजित ‘हेरिटेज अ‍ॅण्ड नेचर’ या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून घेतला. चित्रकलेच्या आवडीपायी प्रा. विजया पातुरकर, ऋतुजा अष्टुरे, मोहिनी यन्नावार आणि मनीषा कुलकर्णी या चार मैत्रिणी एकत्र आल्या आणि त्यांनी रंगांची कुपी रसिकांपुढे रिती केली.

या चारही जणींना चित्रकला मनापासून आवडते. प्रत्येकीने चित्रकलेच्या कोणत्या ना कोणत्या अंगात विशेष प्रावीण्यही मिळविले आहे. आपापल्या कलेची जोपासना करण्यासाठी या चौघी जणी नियमितपणे चित्रे रेखाटतात, पण आजवर त्यांचा हा छंद केवळ त्यांच्यापुरताच मर्यादित होता. आपली ही कला रसिकांपुढे आणावी अशी कल्पना या मैत्रिणींना सुचली आणि एकमेकींच्या साह्याने त्यांनी चित्र प्रदर्शनाचे आयोजन करून या क्षेत्रात स्वत:ची आणि स्वत:च्या कलाकृतींची ओळख निर्माण करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. 

अजिंठ्याच्या कलाकृती आपल्याला मनापासून साद  घालतात, त्यामुळे या कलाकृतींचाच विशेष अभ्यास करून आपण अजिंठा लेणीचे भावविश्व साकारण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला, असे चित्रकार मोहिनी यन्नावार यांनी प्रांजळपणे सांगितले. वारली ही अतिप्राचीन कलांपैकी एक़ अ‍ॅक्रेलिक रंगांमध्ये वारलीचा हा मोहक आविष्कार चितारून मनीषा कुलकर्णी यांनी वारली कलाकृतींची कित्येक मोहक रुपे साकारली. प्रत्येक  रंगाप्रमाणे गुलाबाच्या फुलाचे मूळचेच देखणे असणारे रूप कसे आणखीनच फुलून येते हे पातुरकर यांच्या गुलाबपुष्प मालिकेतून कलाप्रेमींना अनुभवायला मिळाले. तसेच ऋतुजा अष्टुरे यांची आई आणि लेकरू या संकल्पनेवर आधारलेली प्राण्यांची वास्तववादी चित्रे रसिकांना भावविभोर करून गेली. 

चित्रकला एकच पण त्यातून प्रत्येकीचे स्वतंत्र परंतु सक्षम रूप प्रकर्षाने दिसून आले. कलाक्षेत्रात होणारे बदल कलाप्रेमींपर्यंत पोहोचावेत आणि कलेच्या धाग्यात गुंफले गेलेले कलाकार आणि रसिक हे नाते अधिकच फु लून यावे, यासाठी अशा प्रकारची कलाप्रदर्शने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतात, हे प्रदर्शनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून दिसून आले. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcultureसांस्कृतिकpainitingsपेंटिंग