शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख हेक्टर्सवर नांगर !

By admin | Updated: July 30, 2015 00:45 IST

लातूर : यंदा पेरणी झाल्यानंतर पावसाने ताण दिला आहे. तब्बल पाच आठवड्यांपासून पाऊस झालाच नाही. त्यामुळे पेरणी वाया गेली असून, पेरणी झालेल्या

लातूर : यंदा पेरणी झाल्यानंतर पावसाने ताण दिला आहे. तब्बल पाच आठवड्यांपासून पाऊस झालाच नाही. त्यामुळे पेरणी वाया गेली असून, पेरणी झालेल्या दीड लाख हेक्टर्सवर शेतकऱ्यांनी नांगर फिरविला आहे. तर २ लाख ५१५ हेक्टर्सवरील पिके करपून गेली आहेत. किमान पीकविमा तरी मिळेल म्हणून हे क्षेत्र शेतकऱ्यांनी मोडीत काढले नाही. लातूर जिल्ह्यात ५ लाख ५६ हजार ८६० हेक्टर्स खरीपाचे क्षेत्र आहे. यापैकी ३ लाख ५८ हजार ५१५ हेक्टर्सवर पेरणी झाली आहे. या पेरण्यांचे प्रमाण ६४.४ टक्के आहे. सर्वाधिक सोयाबीनचा पेरा २ लाख ३६ हजार ९८७ हेक्टर्सवर झाला आहे. मात्र गेल्या पाच आठवड्यांपासून पाऊस झाला नाही. मृग नक्षत्र वगळता नंतर पाऊसच नाही. पावसाअभावी पिके करपली आहेत. चांगल्या जमिनीवरील पिकांनी तग धरली होती. परंतु, पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे ती पिकेही करपली आहेत. त्यामुळे पिके मोडण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत १ लाख ५० हजार हेक्टर्सवरील पिके मोडीत काढण्यात आली आहेत. त्यामध्ये सोयाबीन-४७ हजार ६८३, तूर-४०३१, सूर्यफुल-२०००, मका-३८०, बाजरी-२०० आदी १ लाख ५० हजार हेक्टर्सवरील पिके मोडीत काढली आहेत. लातूर तालुक्यात सोयाबीन १९०२, तूर २०१०, औसा तालुक्यात तूर ७००, सूर्यफुल ७००, मका ३८०, बाजारी २००, निलंगा तालुक्यात सोयाबीन ३०००, तूर ३२७, शिरूर अनंतपाळ तालुक्यात सोयाबीन २२५०, रेणापूर तालुक्यात ३२५०, तूर ४५०, चाकूर तालुक्यात सोयाबीन ९५००, तूर २६६४ असे एकूण जिल्ह्यात १ लाख ५० हजार हेक्टर्सवरील पिके मोडीत काढली आहेत. अन्य २ लाख ५१५ हेक्टर्सवरील पिके करपली आहेत. परंतु, पीकविम्यासाठी शेतकऱ्यांनीते मोडीत काढले नाही. उदगीर, देवणी, जळकोट, अहमदपूर या तालुक्यांत मात्र पीक मोडीत काढण्याचे प्रमाण थोडे कमी आहे. या तालुक्यात पेरणीनंतर हलकासा पाऊस झाला होता. त्यामुळे पिकांनी तग धरली आहे. देवणी, उदगीर व जळकोट तालुक्यात गेल्या शुक्रवारी रिमझिम पाऊस झाला होता. या पावसामुळे पिकांनी तग धरली आहे. (प्रतिनिधी)