छत्रपती संभाजीनगर : व्हॉट्सॲपवर तरुणीला मसाजची विचारणा करून तिलाच मसाज शिकवण्याच्या दोन वाक्याच्या मेसेजवरून शहरातील बडा सराफा व्यावसायिक हनी ट्रॅपमध्ये अडकला. आरोपी मानसी मनोहर जाधव उर्फ मानसी निशिकांत शिर्के (२४), अर्जुन प्रकाश लोखंडे (३७) व आदित्य ज्ञानेश्वर शिरे (२१, सर्व रा. भीमनगर, भावसिंगपुरा ) यांनी त्याच्याकडून ९ महिन्यांत तब्बल १५ लाख रुपये उकळले.
५९ वर्षीय सराफा व्यापारी ४० वर्षांपासून कासारी बाजारात व्यवसाय करतात. साळवे नामक महिलेने फेब्रुवारीमध्ये मानसी एअर होस्टेस असल्याचे सांगत बॉडी मसाजचे काम करत असल्याचे व्यापाऱ्याला सांगितले. ८ मे रोजी व्यापाऱ्याने तिच्या मोबाइल क्रमांकावर मसाजसाठी विचारणा केली. मानसीने नकार कळविल्यावर व्यापाऱ्याने 'मी तुला मसाज शिकवतो' असा मेसेज पाठवला. १२ मे रोजी मानसीने त्याचे भांडवल करत ब्लॅकमेलिंग सुरू केली. त्याच दिवशी दुकानात जाऊन १ लाख रुपये व मणीमंगळसूत्र घेतले. त्यानंतर आदित्य, अर्जुनच्या मदतीने सातत्याने धमकावणे सुरू केले.
गाडीत पिस्तूल लावलेनऊ महिन्यांत व्यापाऱ्याकडून १५ लाख उकळले. २२ जानेवारी रोजी खडकेश्वर मंदिराजवळ वाहनात अर्जुनने त्याच्यावर पिस्तूल रोखत कारागृहात असलेल्या मानसीच्या पतीच्या नावाने धमकावत ५ लाख मागितले. अर्जुनही नुकताच कारागृहातून बाहेर आला आहे.
काही तासात ५० कॉलआरोपींचे ब्लॅकमेलिंग वाढत चालल्याने व्यापाऱ्याने उपायुक्त नितीन बगाटे, सहायक आयुक्त संपत शिंदे यांच्याकडे तक्रार केली. २८ जानेवारी रोजी पोलिसांसमोर आराेपींनी व्यापाऱ्याला किमान २ लाख द्यावेच लागतील, या मागणीसाठी तब्बल ५० वेळा कॉल केले. त्यानंतर निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सापळा रचला. जोहरीवाड्यात मानसी, आदित्यला २० हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तेव्हा मानसीने पैसे मिळाल्याचे लिहून सही देखील केली. पैसे स्वीकारण्यासाठी येत असलेली चारचाकीही पोलिसांनी जप्त केली. ती ऑगस्ट २०२४ मध्ये खरेदी केली आहे.
पोलिसांच्या नावाने धमक्याहर्सूल जेलचा संजय जाधव नामक कर्मचाऱ्याला ती व्यापाऱ्याकडे धमकाविण्यासाठी घेऊन गेल्याचे फुटेज पोलिसांनी मिळवले. मानसीच्या जवळची एक महिला नातेवाईक शहर पोलिस दलात अंमलदार आहे.
आणखी ४ जणांसोबत चॅटिंगपोलिस तपासणीत आरोपींच्या मोबाइलमध्ये आणखी ४ पुरुषांसोबतचे चॅटिंग आढळले असून, त्यात छायाचित्रांचा देखील समावेश आहे. या टोळींनी अनेकांना ब्लॅकमेल केल्याचा संशय आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. आरोपींनी अन्य कोणाला ब्लॅकमेल केले असल्यास त्यांनी समोर यावे, असे आवाहन पोलिस उपायुक्त बगाटे यांनी केले आहे.
बडे व्यावसायिक, व्यापारी हनी ट्रॅपमध्येशहरात बडे व्यावसायिक, व्यापाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. यापूर्वी तक्रारदार समोर आल्याने जवाहरनगर सातारा ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले.- ऑगस्ट, २०२४ मध्ये बँक मॅनेजरला हनी ट्रॅपमध्ये अडकवून ४० लाखांची मागणी. यात सिद्धार्थ ठोकळ व त्याच्या मैत्रिणीवर गुन्हा.- १३ जानेवारी रोजी ५५ वर्षीय केटरिंग व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून ३ लाख रुपये उकळले. यात सायली गायकवाड, पिंटू जाधवसह टोळीवर गुन्हा.