शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणक्षेत्रात खळबळ! पुरस्कार मिळालेल्या शाळेच्या मुख्याध्यापकास तांदुळ चोरताना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 13:50 IST

शिक्षकदिनाच्या आदल्या रात्री ग्रामस्थांनी उघडकीस आणला प्रकार, शाळेला कुलूप ठोकल्यानंतर गुन्हा दाखल

नाचनवेल, पिशोर : कन्नड तालुक्यातील वाकद येथील पुरस्कार मिळालेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकासह अन्य दोघांना बुधवारी मध्यरात्री शालेय पोषण आहाराच्या तांदळाची वाहनातून चोरी करताना ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. या मुख्याध्यापकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी सकाळी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. त्यानंतर पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकद येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक अश्फाक शेख कादर हे बुधवारी रात्री ११:०० वाजता एक टेम्पो (एमएच ०३ एएच ३५०८) घेऊन शाळेजवळ आले. त्यानंतर टेम्पोमालक व चालक रमजान जमालखा पठाण व हमाल एजाज शेख बन्नू (दोघेही रा. घाटनांद्रा, ता. सिल्लोड) यांना सोबत घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आलेल्या पोषण आहाराच्या तांदळाच्या ९ गोण्या (वजन अंदाजे ५ क्विंटल ५० किलो) त्यांनी टेम्पोत टाकल्या. ही बाब ग्रा. पं.चे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ धाव घेऊन टेम्पो व मुख्याध्यापकासह तिघांना पकडले. त्यानंतर पिशोर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस तत्काळ गावात दाखल झाले. त्यांनी टेम्पो ताब्यात घेऊन सर्वांना पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर शाळा समितीचे अध्यक्ष विष्णू थोरात, सदस्यांनी केंद्रप्रमुखांकडे व पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर सायंकाळी केंद्रप्रमुख भिवसिंग बिलंगे यांच्या फिर्यादीवरून मुख्याध्यापक अश्फाक शेख कादर यांच्याविरूद्ध पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्याध्यापक शेख हे दीड वर्षानंतर सेवेतून निवृत्त होणार होते.

शिक्षकदिनी मंदिरात भरली शाळामध्यरात्री मुख्याध्यापकाकडूनच शाळेतील तांदूळ चोरण्याचा प्रयत्न झाल्याचे लक्षात येताच गुरुवारी सकाळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ शाळेत जमले. शाळेला कुलूप ठोकून मुख्याध्यापकावर शिक्षण विभागाने तत्काळ कारवाई करावी. गुन्हा दाखल होईपर्यंत शाळा उघडू देणार नसल्याची भूमिका घेतली. असे सरपंच वंदना चिकटे यांनी सांगितले. त्यामुळे ऐन शिक्षक दिनी गावातील मंदिरात शाळा भरविण्यात आली.

जि. प.च्या पथकाकडून तपासणीयाबाबत माहिती मिळताच गुरुवारी सकाळीच जिल्हा परिषदेचे शिक्षण अधीक्षक सचिन शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी डी. टी. शिंदे, शेलगावचे केंद्रप्रमुख भीमसिंग बिलंगे, चिंचोलीचे केंद्रप्रमुख कौतिक सपकाळ, नितीन वाघ यांचे पथक शाळेत दाखल झाले. पथकाने चौकशी केली. त्यानंतर पोषण आहाराचे रजिस्टर व दप्तर असलेल्या कपाटाला कुलूप असल्याने सर्व कपाटे सील केली. त्यानंतर त्यांनी याबाबत वरिष्ठांना अहवाल सादर केला.

शाळेला मिळालेला पुरस्कार रद्दजि. प.च्या वतीने जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण व उपक्रमशील शाळेचा पुरस्कार वाकद येथील शाळेला जाहीर झाला होता. परंतु, या शाळेचे मुख्याध्यापक अश्फाक शेख कादर यांच्या चोरीचा कारनामा शिक्षक दिनाच्या पूर्वरात्रीच उघड झाल्यानंतर गुरुवारी सकाळीच या शाळेला मिळालेला पुरस्कार जिल्हा परिषदेने रद्द केला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीEducation Sectorशिक्षण क्षेत्रzp schoolजिल्हा परिषद शाळा