शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात अडचणीच्या वेळी मदतीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६० जणांची फौज तयार!

By विकास राऊत | Updated: June 20, 2024 17:44 IST

२४ तास हा कक्ष कार्यान्वित राहणार आहे

छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्कालीन कक्ष सुरू केला आहे. जिल्ह्यात १६० जणांची फौज आपत्कालीन व्यवस्थापनासाठी तयार केली आहे. २४ तास हा कक्ष कार्यान्वित राहणार असून, मदतीसाठी जिल्हा प्रशासनासह तहसील, तालुक्यात नगरपालिका, शहरात महापालिकेशी संपर्क साधता येणार आहे.

जिल्ह्यात गोदावरी नदीकाठावर निळ्या रेषेखाली येणाऱ्या गावांमध्ये पैठण तालुक्यात १८, वैजापूर तालुक्यात १७ आणि गंगापूर तालुक्यात ८ अशी एकूण ४३ गावे आहेत. पैठण तालुक्यात पैठण शहर, कावसान, दादेगाव - जहांगीर, नायगाव, वडवळी, नवगाव तसेच वैजापूर तालुक्यातील डोणगाव, बाबतारा, लाखगंगा, नांदूरढोक, बाभूळगाव, बाजारठाण या गावांना पुरामुळे वेढा पडतो. तेथील यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.

जिल्ह्यात आपत्कालीन कक्ष सुरू...१ जूनपासून जिल्हा आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आला आहे.

१६० जणांची टीम...१६० जणांची टीम जिल्ह्यासाठी तयार करण्यात आली आहे. यासाठी लागणारे सर्व साहित्य प्रशासनाने तयार ठेवले आहे.

२४ तास अलर्ट...जिल्हाधिकारी कार्यालयात पावसाळ्याच्या अनुषंगाने सुरू केलेला आपत्कालीन कक्ष २४ तास सुरू राहणार आहे.

पावसाळ्यात या गावांना धोका...छत्रपती संभाजीनगर १६,पैठण १५,फुलंब्री ७,वैजापूर ३१,गंगापूर २६,खुलताबाद ६,सिल्लोड १०,कन्नड ४८,सोयगाव ६,एकूण : १६५

मदतीसाठी संपर्क कसा साधाल?जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभाग कक्ष आहे. तसेच पाटबंधारे विभागात पूरनियंत्रण कक्ष आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाशी २४ तास संपर्क करता येईल. 

प्रशासन सज्जप्रशासनाने सर्व विभागांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्कालीन विभाग २४ तास कार्यान्वित केला आहे. पावसाळ्यात प्रशासन अलर्ट मोडवर असणार आहे.- मारुती म्हस्के, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

बचाव कार्यासाठी असलेली साधने अशी...बोटी : ५ बोटी,लाइफ जॅकेट्स १९५,लाइफ बॉय १६०,बचाव साहित्य किट २१५,फोल्डिंगचे स्ट्रेचर ८१५,बॉडी कव्हर बॅग्ज ८१५,सेफ हेल्मेट्स १३२,प्रकाश योजना संच १७,गम बूट जोड २७६,तात्पुरते तंबू २०,दुर्बिणी व साहित्य : ५ वीज अटकाव यंत्रणा : ७९ ठिकाणी

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग