शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar Crime: गांजाच्या नशेत रस्त्यावर झाला वाद, मग मैदानावर नेत जिवलग मित्रानेच चिरला तरुणाचा गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 14:08 IST

मारेकऱ्याला पहाटे घरातून अटक; जानेवारीत हत्येचा प्रयत्न करून जिन्सीतच वास्तव्य, तरी पोलिसांना नाही सापडला

छत्रपती संभाजीनगर : एसएफएस शाळेच्या मैदानावर सुरेश भगवान उंबरकर (३०, रा. कैलासनगर) या तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री ११.३० वाजता उघडकीस आलेल्या या घटनेत जिवलग मित्र सचिन उर्फ जंगली मच्छिंद्र जाधव (२४, रा. जुना बायजीपुरा) यानेच त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने सचिनचा शोध घेत बुधवारी पहाटे काली बावडी परिसरातून त्यास अटक केली.

सुरेश गारखेड्यातील स्वयंपाकी होता. सध्या तो एका अंडाभुर्जीच्या गाडीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. जालना रोडवरील एसएफएस शाळेच्या मागील मैदानावर कायमच अंधार असतो. त्यामुळे येथे नेहमीच नशेखोरांच्या बैठका रंगतात. मंगळवारी रात्री अशाच काही नशेखोरांना एका खड्ड्यात तरुणाला मारहाण होत असल्याचे दिसले. त्यांनी तिकडे धाव घेईपर्यंत सुरेश गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती कळताच जवाहरनगरचे पोलिस निरीक्षक सचिन कुंभार, गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार, सहायक निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तत्काळ तपासाची चक्रे फिरवली.

पहिले रस्त्यावर झाला वाद, मग मैदानावर नेत चिरला गळाहत्येनंतर सचिनला पळून जाताना काहींनी पाहिले होते. मैदानावर जाण्यापूर्वी सचिन व सुरेशचे जालना रोडवरच जोरजोरात भांडण झाले होते. हे अनेकांनी पाहिले होते. त्यातील काहींनी सचिनला ओळखले होते. त्यामुळे उपनिरीक्षक प्रवीण वाघ, अंमलदार नवनाथ खांडेकर, संदीप तायडे, संजय गावंडे, सुनील जाधव, योगेश नवसारे, सोमकांत भालेराव, राजेश यदमळ यांनी सचिनचा शोध सुरू केला. पहाटे तो काली बावडी परिसरात नशा करत असल्याचे कळताच पथकाने धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. गांजा पिताना उफाळून आलेल्या जुन्या वादातून हत्या केल्याचे त्याने कबूल केले.

हत्येचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात आरोपी, तरी राजरोस फिरत होतासचिनवर जानेवारी २०२५ मध्ये जवाहरनगर पोलिस ठाण्यातच एकावर प्राणघातक हल्ला करून हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यात तो पसार दाखवण्यात आला. प्रत्यक्षात तो दररोज राजरोस जिन्सी, हेडगेवार रुग्णालय परिसरात फिरत होता, तरीही सदर गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्याला तो मिळून कसा आला नाही, असा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Drugged Friend Gruesomely Murders Youth Over Argument in Aurangabad Field

Web Summary : In Aurangabad, a youth was murdered by his friend in a field following a roadside argument fueled by marijuana. The accused, with a prior attempted murder charge, was arrested while intoxicated, confessing to the crime stemming from an old dispute.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी