शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सन्मान योजनेची टोलवाटोलवी; रक्कम खात्यात जमा होत नसल्याने बळीराजा हताश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 18:26 IST

टोलवाटोलवी सुरू असल्यामुळे बळीराजा हताश झाला आहे.

सोयगाव (औरंगाबाद ) : सरकारच्या वतीने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या शेतकरी सन्मान योजनेबाबत नुसती टोलवाटोलवी सुरू असल्यामुळे बळीराजा हताश झाला आहे. सर्व कागदपत्रे जमा करूनही दोन हजार रुपये खात्यात जमा होत नसल्याने या कारभाराविरुद्ध तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन शासनाने जाहीर केलेली रक्कम खात्यात जमा करावी, नसता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सोयगाव तालुक्यात शेतकरी सन्मान योजनेसाठी कृषी, महसूल आणि पंचायत समिती या त्रिसदस्यीय समितीच्या वतीने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे सर्वेक्षण पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली.मध्यंतरी निवडणुकांचा अडसर योजनेला आल्याने योजनेचे काम बंद झाले. मात्र, निवडणुकानंतरही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर बँकेत रक्कम जमा न झाल्याने चौकशी करणाऱ्या शेतकऱ्यांना महसूल विभागाकडून योजना कृषी विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे उत्तर मिळाले असल्याने कृषी विभागाने मात्र हात वर करून योजनेबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितल्याने निवडणुकानंतरही केवळ टोलवाटोलवीचा खेळ सुरू झाल्याने बळीराजाने संताप व्यक्त केला आहे.

 महसूल विभागाकडून पोर्टलवर अपलोड करण्यात पात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नावात त्रुटी आल्या होत्या. या त्रुटी संबंधित विभागाने तलाठ्याकडून दूर करूनही योजनेचा निधी खात्यावर वर्ग होत नसल्याने अचानक या योजनेचे सूत्र शासन पातळीवरून तालुका कृषी विभागाला वर्ग करण्याच्या सूचना आल्याने महसूल विभागाने शेतकऱ्यांचा डाटा कृषी विभागाला वर्ग केला; परंतु कृषी विभागाकडून याबाबत कोणतेही पाऊल उचलले गेले नसल्याने योजनेला एक प्रकारे हरताळ फसल्याचे दिसून येत आहे.

पहिल्या टप्प्यातील शेतकरीच निधीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या नावात त्रुटी असल्याने या त्रुटी दूर करून सदोष डाटा कृषी विभागाकडे तीन दिवसांत सादर करण्यात येणार असल्याचा दुजोरा महसूल विभागाने दिला आहे.च्दरम्यान पहिल्या टप्प्यातील कारवाईतून सुटलेल्या वंचित अल्पभूधारक शेतकऱ्यांचा डाटा संकलित करण्याचे काम संयुक्त पथकांकडून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्याप पहिल्या टप्प्यात पात्र झालेल्या शेतकऱ्यांना निधी मिळालेला नाही. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीfundsनिधी