शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

अमित शाह यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द, शेतकरी आंदोलनाने रोखला मार्ग?

By विकास राऊत | Updated: February 13, 2024 16:18 IST

छत्रपती संभाजीनगर येथील सभेची संपूर्ण तयारी पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्यांदा सभा रद्द

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांची गुरुवारी होणारी सभा रद्द झाली आहे. सभा रद्द होण्या मागील कारण अस्पष्ट आहे. परंतु अनेक तर्क यामागे लावले जात आहेत. यात मुख्य कारण शेतकरी आंदोलनाचे असल्याचे बोलले जात आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केल्याने शाह यांनी आपला दौरा रद्द केल्याची माहिती आहे. दरम्यान, भाजपा पदाधिकाऱ्यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभेच्या तयारीची आज दुपारी पाहणी केली. त्यानंतर काही वेळातच शाह यांचा गुरुवारचा दौरा रद्द झाल्याचा मेसेज आला. यापूर्वी देखील सप्टेंबर 2023 मध्ये शाह यांची शहरातील सभा रद्द झाली होती.

अमित शाह यांची छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित सभा दुसऱ्यांदा शहा रद्द झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये त्यांची सभा नियोजित केली होती. त्यावेळेसही पूर्ण व्यासपीठ उभा केल्यानंतर ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला होता. तसाच प्रकार यावेळेस सुद्धा घडला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज दुपारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभेच्या नियोजनाची पूर्ण मेहनत वाया गेली आहे. सभेसाठी सर्व परवानगीची पूर्तता केली. दुपारी अडीचच्या दरम्यान सभा रद्द झाल्याचा निरोप भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आला. त्यामुळे यावेळेस देखील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. दरम्यान, सभा पुढे ढकलण्यात आल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांच्यावतीने सांगण्यात येत आहे.

शेतकरी आंदोलनाने रोखला मार्ग ?शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा विविध मागण्यांसाठी सरकारविरोधात आंदोलन छेडले असून दिल्लीकडे कूच केली आहे. माहितीनुसार, शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी लाठी आणि अश्रूधुराच्या नळकांड्यासह जवानांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सरकारकडून काळजी घेतली जात आहे. पण, गोळ्या झाडा किंवा लाठीचार्ज करा, आमचे शांततेत आंदोलन सुरूच राहील, असे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.  एकूणच शेतकरी आंदोलनामुळे परिस्थिती बदलत असल्याने गृहमंत्री शाह यांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द झाला असल्याची चर्चा आहे.

लोकसभेसाठी प्रथमच भाजप-शिवसेना आमनेसामनेदेशात निवडणुका सुरू झाल्यानंतर प्रथमच भारतीय जनता पक्ष औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून प्रत्यक्ष लढणार, असे जवळजवळ निश्चित झाले आहे. गेल्या निवडणुकीपर्यंतचा युतीतील भाजपचा जिवलग मित्र व विद्यमान कट्टर विरोधक शिवसेना (उबाठा) यांच्यात ही लक्षवेधी झुंज होईल, असे दिसते. गेली २५ वर्षे युतीत सोबत राहून अनेक देदीप्यमान विजय मिळविणारे भाजप व शिवसेना आता कट्टर विरोधक म्हणून आमनेसामने येणार असून, जनता कोणाच्या बाजूने उभी राहते, तेही स्पष्ट होईल.

टॅग्स :Amit Shahअमित शाहAurangabadऔरंगाबादBJPभाजपा