शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आकांक्षा देशमुखच्या खुनाचे गूढ कायम; शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी घटनास्थळाची केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 22:08 IST

आकांक्षा तिच्या रूममध्ये मृतावस्थेत आढळली होती, तिच्या शरीराला मुंग्या लागल्या होत्या.

ठळक मुद्देमृतदेह हलविल्यामुळे वाढले पोलिसांचे कामवसतिगृहाच्या रेक्टरसह मुलींची होणार चौकशीआकांक्षाचा मोबाईल, लॅपटॉप आणि डायरी जप्त

औरंगाबाद : एमजीएममधील मुलींच्या वसतिगृहाची सुरक्षा व्यवस्था भेदून तेथे राहणाऱ्या डॉ. आकांक्षा अनिल देशमुख (वय २२, रा. माजलगाव) या विद्यार्थिनीचा खून कोणी आणि कसा केला, याचा उलगडा २४ तासांनंतरही पोलिसांना करता आला नाही. दरम्यान, शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचे पथक, सिडको पोलीस आणि गुन्हे शाखेच्या अधिकानी गुरुवारी वसतिगृहातील आकांक्षाच्या रूमची पाहणी केली आणि ही घटना कशी झाली असेल, याबाबत मंथन केले. शिवाय वसतिगृह परिसरातील विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पोलिसांनी तपासणी सुरू केली.

आकांक्षा ही एमजीएम फिजिओथेरपी कॉलेजमध्ये मास्टर्स आॅफ फिजिओथेरफी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. एमजीएम कॅम्पसमधील गंगा मुलींच्या वसतिगृहात ती राहत होती. ११ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ ते पावणेदहा वाजेच्या सुमारास आकांक्षा तिच्या रूममध्ये मृतावस्थेत आढळली होती. तिच्या शरीराला मुंग्या लागल्या होत्या. ही माहिती पोलिसांना न कळविता उपस्थितांनी लगेच आकांक्षाला एमजीएममधील अपघात विभागात दाखल केले. तेथील डॉक्टर निपुण केसरकर यांनी आकांक्षाला तपासून मृत घोषित केले.

याबाबतची एमएलसी सिडको पोलीस ठाण्याला रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास प्राप्त झाली. त्यानंतर आकांक्षाचे चुलतभाऊ डॉ. राहुल देशमुख आणि अन्य लोकांनी आकांक्षाचा मृतदेह घाटी रुग्णालयात हलविला. शवविच्छेदन अहवालामध्ये आकांक्षाचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील यांच्या तक्रारीवरून सिडको ठाण्यात बुधवारी रात्री अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. घटनास्थळावरून पोलिसांनी आकांक्षाचा लॅपटॉप, मोबाईल आणि एक डायरी जप्त केली. या डायरीतील मजकूर पोलिसांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. १० डिसेंबर रोजी रात्री ९.३६ वाजता एका व्यक्तीने तिला फोन केला. त्यावेळी आकांक्षा त्या व्यक्तीसोबत केवळ ४० सेकंद बोलली. ती व्यक्ती कोण आणि त्यांच्यात काय बोलणे झाले, याबाबतचा पोलिसांनी तपास सुरू केला.

डॉक्टरांच्या पथकांकडून चार तास तपासणीहा खून कसा झाला असावा, याचा तपास करण्यासाठी सिडको पोलिसांच्या सूचनेवरून घाटीतील शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचे पथक गुरुवारी एमजीएम कॅम्पसमधील घटनास्थळी दाखल झाले होते. या पथकाने सुमारे चार तास रूमची पाहणी करून मृतदेह कसा पडलेला होता. शिवाय रूममधील टेबल, खुर्ची, पलंग कोणत्या स्थितीत होते? ही माहिती जाणून घेतली.

बांधकाम मजुरांची होणार चौकशीशवविच्छेदन अहवालानुसार घटना उघडकीस येण्याच्या पंधरा ते अठरा तासांपूर्वी आकांक्षाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. गंगा वसतिगृहातील चौथ्या मजल्यावर आकांक्षाची रूम होती. त्या रूमच्या विरुद्ध बाजूने नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. झारखंड राज्यातून बांधकामासाठी मजूर आलेले आहेत. या मजुरांची यादी पोलिसांनी मिळविली असून, त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणीगंगा वसतिगृहातील ७२ तासांतील सीसीटीव्ही फुटेजची तसेच वसतिगृहामागील इमारतीवर लावण्यात आलेल्या दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजची सिडको पोलिसांनी तपासणी सुरू केली. या फुटेजमधून महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागेल, अशी अपेक्षा पोलिसांना आहे.

मृतदेह हलविल्यामुळे वाढले पोलिसांचे कामपोलीस निरीक्षक निर्मला परदेशी म्हणाल्या की, खुनाचा गुन्हा नोंदवून आम्ही तपास सुरू केला. तिचा खून झाला असे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. शिवाय ही आत्महत्याही असू शकते, असेही म्हटले जात आहे. मात्र आत्महत्येसारखा कोणताही पुरावा घटनास्थळी आढळला नाही. घटनास्थळावरून मृतदेह हलविण्यात आल्याने आमचे काम वाढल्याचे त्यांनी सांगितले.

मृताच्या नातेवाईकांचा जबाब नोंदविणारआकांक्षाचे आई-वडील, चुलत भाऊ यांचेही जबाब नोंदवून घेतले जाणार आहेत. तिच्या खुनामुळे कोणाला आर्थिक लाभ होणार होता, का यादृष्टीनेही तपास केला जाणार आहे.