शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

महागाईने मोहरला आंबेमोहोर; तब्बल ४० रुपयांची वाढ, दर थेट एकशेवीस रुपये किलोच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 11:15 IST

आंबेमोहोर पाठोपाठ कालीमूछ या तांदळातही किलोमागे ६ ते १० रुपयांची वाढ झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सव असल्याने, बाप्पाच्या आवडत्या मोदकांचा सुगंध घराघरात दरवळतोय. या मोदकांसाठी खास वापरला जाणारा आंबेमोहोर तांदूळ मात्र यंदा ग्राहकांच्या खिशाला कडक झळ देतो आहे. बाजारात आंबेमोहोरचा दर तब्बल १२० रुपयांच्या घरात पोहोचला असून आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. फक्त आंबेमोहोरच नव्हे तर कालीमूछच्या दरातही वाढ झाली आहे.

आंबेमोहोर एकशेवीसच्या घरातगेल्या वर्षी आंबेमोहोर तांदूळ ८० ते ८५ रुपयांत मिळत होता. यंदा त्याचा दर किलोमागे ४० रुपयांनी वाढून सध्या १२० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.

खास मोदकांसाठी होतो वापरगणेशोत्सवात उकडीचे मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखविले जातात. या मोदकासाठी आंबेमोहोर तांदळाला सर्वाधिक पसंती दिली जाते. उकडलेले मोदक या तांदळामुळे नरम, मऊसर आणि सुगंधी लागतो. यामुळे सध्या आंबेमोहोरची मागणी झपाट्याने वाढत आहे. आणि उकडीचे एक मोदक ३५ ते ४० रुपयांना मिळत आहे.

डिसेंबरपर्यंत दर चढेच राहणारसध्या सुरू असलेले दर लवकर कमी होण्याची चिन्हे नाहीत. नवीन हंगामातील उत्पादन बाजारात येईपर्यंत म्हणजेच डिसेंबरपर्यंत दर स्थिर राहण्याची शक्यता कमी आहे.- रिंकू खटोड, व्यापारी

कालीमूछमध्येही दरवाढआंबेमोहोर पाठोपाठ कालीमूछ या तांदळातही किलोमागे ६ ते १० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या ८० ते ८६ रुपये किलोने कालीमूछ विकल्या जात आहे तर कोलम तांदळाचे भाव ६० ते ७० रुपये किलोने स्थिर आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfoodअन्न