छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आरक्षणातील उपवर्गीकरणासंदर्भात नेमलेल्या न्या. बदर समितीचा अहवाल घोषित न करताच त्यावर हरकती व सूचना राज्य सरकारने मागविल्या आहेत. सूचना व हरकतीही सुट्या व भीमजयंती काळातील पाच दिवसांत सादर करायच्या आहेत. सरकारची ही कृती अन्याय व जाती-जातींत भांडणे लावणारी आहे. त्यामुळे सरकारच्या या धोरणाचा निषेध करणारे फलक व होर्डिंग्ज भीमजयंतीच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या चित्ररथावर, उभारण्यात येणाऱ्या स्वागत मंचावर लावावेत, असे आवाहन रविवारी झालेल्या आंबेडकरी अनुयायांच्या बैठकीतून करण्यात आले.
एससी प्रवर्गातील आरक्षण उपवर्गीकरणासाठी नेमलेल्या न्याय. बदर समितीच्या अहवालावर आक्षेप व हरकती नोंदविण्यासाठी राज्य सरकारने दि. ११ ते १५ एप्रिल असा कालावधी जाहीर केला. यामुळे आंबेडकरी अनुयायी व आरक्षणभोगी समाजात संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी पीपल्स अभियांत्रिकी महाविद्यालयात एका व्यापक बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत सरकारच्या आरक्षण घेणाऱ्या जातींत फूट पाडण्याच्या भूमिकेवर उपस्थितांनी प्रखर टीका केली. उपवर्गीकरणाआडून सरकार आरक्षणच नष्ट करण्याची चाल खेळत आहे. या उपवर्गीकरणामुळे ५९ मधील कोणत्याही जातीचा फायदा होणार नाही; उलट एससी प्रवर्गाची शक्ती विभाजित होऊन आरक्षण लढा कमकुवत होईल, अशी भावना व चिंता व्यक्त करण्यात आली.
सरकारी धोरणाचा निषेध करण्यासाठी भीमजयंतीच्या कार्यक्रमातून प्रबोधन करणे, सरकारचा निषेध नोंदवणारी होर्डिंग्ज मिरवणुकीतील चित्ररथावर लावणे, तसे देखावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. शिवाय सर्व जनतेने या अहवालाला विरोध करणारे ईमेल व निवेदने सरकारने दिलेल्या वेबसाइटवर पाठवावीत, असेही आवाहन करण्यात आले. या संदर्भात आंबेडकर जयंतीनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे.
या बैठकीला नगरसेवक अमित भुईंगळ, दीनकर ओंकार, गौतम खरात, मिलिंद दाभाडे, विजय मगरे, दौलत मोरे, सचिन निकम, डॉ. शंकर अंभोरे, कृष्णा बनकर, ॲड. तथागत कांबळे, मुकुल निकाळजे, कृष्णा भंडारे, भीमसेन कांबळे, अशोक कांबळे, विजय वाहूळ, दीपक निकाळजे, आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Web Summary : Ambedkarites will protest the sub-categorization of SC reservation during Bhim Jayanti. The government's move is seen as divisive and weakening the SC category. Protests, hoardings, and awareness campaigns are planned. Further action will be decided post-Jayanti.
Web Summary : अंबेडकरवादी भीम जयंती के दौरान एससी आरक्षण के उप-वर्गीकरण का विरोध करेंगे। सरकार के इस कदम को विभाजनकारी और एससी श्रेणी को कमजोर करने वाला माना जा रहा है। विरोध प्रदर्शन, होर्डिंग और जागरूकता अभियान की योजना है। आगे की कार्रवाई जयंती के बाद तय की जाएगी।