शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

दानवे माझे शिष्य... तेच मला भेटायला येतील, कारण...; तिकीट जाहीर झाल्यानंतर काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 13:23 IST

खैरे म्हणाले, "दानवे हे माझे सहकारी आहेत. मी आधीच म्हटले होते की, ते माझे शिष्यही आहेत. आम्ही सर्व पदाधिकारी एकत्रितपणे काम करू. यावेळी, दानवेंना भेटायला जाणार का? असे विचारले असता, खैरे म्हणाले...

लोकसभा निवडणुकीचा शंखनाद झाल्यानंतर, सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. पक्षांकडून आपापले उमेदवारही जाहीर करण्यात येत आहेत. यातच, महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून (उद्धव ठाकरे गट) छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी कुणाला उमेदवारी दिली जाते? चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेनेचे हे दोन नेते उत्सुक होते. शर्यतीत होते. मात्र अखेर आज ठाकरे गटाने 17 जागांवर आपले उमेदवार घोषित केले. यात चंद्रकांत खैरे यांची वर्णी लागली आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) सलग सहाव्यांदा विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे. यानंतर आता खैरे यांची प्रतिक्रियाही आली आहे.

दानवे माझे शिष्य... -यासंदर्भात बोलताना खैरे म्हणाले, "दानवे हे माझे सहकारी आहेत. मी आधीच म्हटले होते की, ते माझे शिष्यही आहेत. आम्ही सर्व पदाधिकारी एकत्रितपणे काम करू. यावेळी, दानवेंना भेटायला जाणार का? असे विचारले असता, खैरे म्हणाले, दानवेच मला भेटायला येतील, कारण आता सर्व येतील त्याप्रमाणे तेही येतील. आम्ही सर्वजण एकमेकांना भेटत असतो. शिवसेनेत तेवढ्यापुरतीच स्पर्धा असते. एकदा तिकीट मिळाल्यानंतर आम्ही काही बोलत नाही." खैरे एबीपी माझ्यासोबत बोलत होते. 

"कुणीही येऊदेत हो, उद्धव ठाकरे जिंदाबाद..." - यावेळी प्रतिस्पर्धक कोण? कारण यावेळी भाजप सोबत नसणार, यासंदर्भात बोलताना खैरे म्हणाले, "भजप सोबत नसले म्हणून काय झाले? महाविकास आघाडी असेलना. काँग्रेस आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी आहे आणि आम्ही, आम्ही सर्व एकत्र आहोत. तसेच, प्रतिस्पर्धक कोण महायुती की एमआयएम? यासंदर्भात बोलताना खैरे म्हणाले, कुणीही येऊदेत हो, उद्धव ठाकरे जिंदाबाद." याच वेळी, "मी विशेष म्हणजे, भद्रामारुतीचे आभार मानेल, भद्रामोरुतीचं दर्शन माननीय उद्धवजींनी केलं आणि माझं काम झालं," असेही खेरे म्हणाले.  

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेAmbadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादShiv Senaशिवसेना