शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आला आमरसाचा हंगाम; औरंगाबाद बाजरपेठेत लालबाग, हापूस दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 16:43 IST

फळांच्या राजाचे बाजारात आगमन

ठळक मुद्देसध्या चढ्याभावामुळे दररोज २५ ते ३० किलोंची विक्री

औरंगाबाद :  खवय्यांना मोहित करणारा फळांचा राजा आंबाबाजारपेठेत दाखल झाला आहे. मात्र, खिशाला न परवडणाऱ्या किमतीमुळे अजून सर्वसामान्य ग्राहक आंबा हातात घेण्यास तयार नाहीत. 

उन्हाचा पारा चढत असताना बाजारात हंगामी फळ आंबा विक्रीला आला आहे. बंगलोरहून लालबाग आला आहे. १५० ते १८० रुपये किलोने हा आंबा विकल्या जात आहे. शहरातील  मोजक्याच  विक्रेत्यांकडे हा आंबा उपलब्ध आहे. हापूस आंबाही आला असून, रत्नागिरीचा हापूस म्हणून तो विकण्यात येत आहे. चक्क १००० ते १२०० रुपये डझन या भावात हापूस विकल्या जात आहे. नवाबपुरा परिसरातील फळांचे विक्रेते शेख खलील यांनी सांगितले की, सध्या चढ्याभावामुळे दररोज २५ ते ३० किलोच आंबे विकल्या जात आहेत. 

मुंबई, पुणे येथे नंबर १ दर्जाचे आंबे विकल्या जातात. औरंगाबादेत चौथ्या, पाचव्या दर्जाचे आंबे विक्रीला येतात. मराठवाड्यातील नंबर १ दर्जाचा केशरही शहरात विक्रीला येत नाही. मुंबई, पुणे आदी महानगरात या आंब्यांना जास्त भाव मिळतो, असेही विक्रेत्यांनी सांगितले. रत्नागिरीचा नंबर एक हापूस फेब्रुवारीपासूनच मुंबई, पुणे बाजारात विक्रीला येत आहे. आपल्याकडे येत असलेला हापूस हा चौथ्या व पाचव्या दर्जाचा असून, मागील १० दिवसांपासून उपलब्ध होऊ लागला आहे. आता येत्या १५ ते २० दिवसांनी आंध्र प्रदेशातील बदाम व एप्रिल महिन्यात गुजरातमधील केशर आंबा विक्रीला येईल. 

अक्षय तृतीयेपासून वाढते आंब्याला मागणी मे महिन्यापासून बाजारात आंबे येण्यास सुरुवात होते. एप्रिल महिन्यात परराज्यातून मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होईल. विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, आजही अनेक ग्राहक असे आहेत की, ते अक्षय तृतीयापासूनच आंबे खाण्यास सुरुवात करतात. यंदा अक्षय तृतीया ७ मे रोजी  येत आहे. त्यानंतरच आंब्याची विक्री वाढेल. 

टॅग्स :MangoआंबाAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाMarketबाजार