शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

आधीच पडझड, भेगा, त्यात ब्लास्टिंगने हादरे; ‘पुरातत्त्व’च्या डोळेझाकने बुद्ध लेणी धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 16:53 IST

लेणी परिसरात ब्लास्टिंग होत असल्याची माहिती पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळाली. परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही.

छत्रपती संभाजीनगर : भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या डोळेझाक करण्याच्या भूमिकेने पर्यटननगरीतील ऐतिहासिक बुद्ध लेणी (औरंगाबाद लेणी) धोक्यात आल्याची ओरड होत आहे. लेणी परिसरातील ब्लास्टिंगच्या प्रकाराने हादरे बसून हा ऐतिहासिक ठेवा आणखी धोक्यात येत आहे. शुक्रवारीही खोदकाम सुरूच होते.

६ जेसीबी, ३ ट्रकबुद्ध लेणी परिसरात शुक्रवारी ६ जेसीबींच्या मदतीने खोदकाम सुरू होते. तीन ट्रकमधून मुरूम भरून नेला जात होता. लेणी परिसरात ब्लास्टिंग होत असल्याची माहिती पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळाली. परंतु, गेल्या काही दिवसांपासून त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. लेणीपासून ३०० मीटर बाहेर सर्व काही होत आहे, असे म्हणून यंत्रणेने हात वर केले.

काय आहे परिस्थिती?बुद्ध लेणीत वारंवार दरड कोसळते. पर्यटकांना सतर्क करण्यासाठी फलकही लावण्यात आलेले आहेत. ठिकठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. ब्लास्टिंगमुळे आणखी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘पुरातत्व’च्या अधिकाऱ्यांचे कानावर हातअवैध ब्लास्टिंगमुळे बुद्ध लेण्यांना धोका निर्माण होत असल्यासंदर्भात ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची खंडपीठाने दखल घेतली आणि ‘सुमोटो’ जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले. यानंतरही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहेत.

गॅझेट नोटिफिकेशन करणे आवश्यकशहर आणि परिसरातील वारसास्थळे ही निझाम राजवटीकडून १९५८ साली भारत सरकारकडे हस्तांतरित करण्यात आली आणि पर्यायाने पुरातत्व विभागाकडे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी देण्यात आली. यासाठी १९५८ मध्ये प्राचीन स्मारके आणि पुराणवास्तुशास्त्रविषयक स्थळे आणि अवशेष अधिनियमदेखील अमलात आलेला आहे. या कायद्यानुसार पुरातत्व विभागाने प्रत्येक वारसास्थळाची निषिद्ध क्षेत्र आणि नियंत्रण क्षेत्र निर्धारित करणे आणि त्याचे गॅझेट नोटिफिकेशन करणे आवश्यक आहे. परंतु, हे बहुतांशी स्थळांच्या बाबतीत झालेले नसल्याने अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे होत आहेत. कायद्यातील तरतुदीचे पालन केल्यास प्रतिबंधात्मक कारवाई करणे सोयीचे होईल.- ॲड. स्वप्नील जोशी, सहसमन्वयक, इंटॅक, छत्रपती संभाजीनगर चॅप्टर

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर