शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आत्मदहन करण्याची परवानगी द्या; अनुदानाच्या प्रतीक्षेतील शेतकरी महिलांची विभागीय आयुक्तांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2023 18:32 IST

मागील तीन वर्षांपासून या महिला शेतकरी पंचायत समितीच्या चकरा मारत आहेत.  

फुलंब्री : विहिरीचे काम पूर्ण होऊन चार वर्ष उलटले तरीही अनुदानाची रक्कम मिळत नसल्याने तालुक्यातील आडगाव खुर्द येथील दोन महिला शेतकऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेऊन आम्हाला आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. 

फुलंब्री तालुक्यातील आडगाव खुर्द येथील अपंग व विधवा शेतकरी सखुबाई अंबादास लोणकर व  भागुबाई साहेबराव तुपे या दोन्ही महिलांना सन २०१७ मध्ये पंचायत समितीकडून रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजूर झाल्या. या विहिरीचे काम २०१९ मध्ये पूर्णही झाले. काम पूर्ण झाल्यास अनुदान मिळाले या आशेवर आर्थिक परिस्थिती बेताची असताना महिला शेतकऱ्यांनी हातउसने करून विहिरीचे काम पूर्ण केले. 

दरम्यान, दोघींनी पंचायत समिती कार्यालयात चकरा मारून सबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे उर्वरित अनुदानाची मागणी केली. मागील तीन वर्षांपासून या महिला शेतकरी पंचायत समितीच्या चकरा मारत आहेत.  शेवटी नाईलाजाने ३ मे रोजी विभागीय आयुक्त यांच्याकडे धाव घेऊन महिला शेतकऱ्यांनी व्यथा मांडली. अनुदानाचे पैसे मिळाले नाही तर ११ मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालय समोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

दोघींची परिस्थिती बेताची आडगाव खुर येथील सखुबाई लोणकर व भागुबाई तुपे  महिला शेतकऱ्याना  वैयक्तिक सिंचन विहिरीकरिता ३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. यातील १ लाख २० हजार रुपये त्यांना मिळाले. मात्र, आणखी १ लाख ८० हजार रुपये पंचायत समितीकडे बाकी आहेत. महिला शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने उर्वरित रक्कम मिळण्यासाठी धडपडत करीत आहेत.

फुलंब्री पंचायत समितीचा कारभार चव्हाट्यावरगेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी नुकताच फुलंब्री पंचायत समिती मधील कारभार चव्हाट्यावर आणला होता आता या कारभारावर आणखी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे दोन महिला शेतकऱ्याची गेल्या तीन वर्ष पासून होणारी फरफट हे एक ताजे उदाहरण समोर आले आहे या प्रकारावर राजकीय नेत्यांनी असलेली चुप्पी मात्र शेतकरी वर्गावर अन्याय करणारी आहे या बाबत पावले उचलण्याची गरज निर्माण झालेली आहे 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद