शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

९२ वर्षीय पित्याकडे तिन्ही मुलांनी फिरवली पाठ; कडाक्याच्या थंडीत ३ दिवस काढले अंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 18:16 IST

एमआयडीसी वाळूज पोलिसांनी वृद्ध व्यक्तीला पोटभर जेऊ घातले; मुलाचे समुपदेशन केल्यावर मुलाने वडिलांना सोबत घेऊन घर गाठले.

वाळूज महानगर : चांगल्या हुद्यावर असणाऱ्या आणि शासकीय नोकरीतून निवृत्ती घेणाऱ्या पोटच्या मुलांनी ९२ वर्षीय वृद्ध वडिलांना सांभाळण्यास असमर्थता दर्शविल्याने वृद्धाचे तब्बल तीन दिवस उपाशीपोटी हाल झाले. अखेर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी वृद्ध व्यक्तीला पोटभर जेऊ घालून मुलाचे समुपदेशन केल्यावर मुलाने वडिलांना सोबत घेऊन घर गाठले.

नगर तालुक्यातील गावात राहणाऱ्या ९२ वर्षीय वृद्ध व्यक्तीला तीन मुले आहेत. त्यातील सर्वांत मोठा मुलगा जलसंपदा विभागामध्ये शासकीय नोकरी करून सेवानिवृत्त झाला आहे, तर दुसरा मुलगा सिडको वाळूज महानगर-१ येथे वास्तव्यास असून एका खाजगी कंपनीमध्ये काम करतो, तर तिसरा सर्वांत लहान मुलगा व्यावसायिक असून, तो नगर तालुक्यात कापड दुकान चालवतो. तिन्ही मुलांची आर्थिक परस्थिती अतिशय चांगली असूनही वृद्धावर तीन दिवस अंगणात उपाशी बसून दिवस काढण्याची वेळ आली.

कडाक्याच्या थंडीत तीन रात्री अंगणातसर्वांत मोठ्या मुलाने, ‘मी दहा वर्षांपासून वडिलांची सेवा केली, यापुढे तू त्यांचा सांभाळ कर’ असे म्हणून वडिलांना नगर जिल्ह्यातून वाळूज महानगरात राहणाऱ्या मधल्या भावाकडे सोडले. वडिलोपार्जीत प्रॉपर्टीचा वाद सुरू असल्याने मोठा भाऊ मधल्या भावाच्या घराचा उंबरठा ओलांडून आत गेला नाही. वडिलांना सोडून तो माघारी फिरताच मधला भाऊ रुग्णालयाचे काम असल्याचे सांगून घराला कुलूप ठोकून परिवारासह निघून गेला. मुलगा येईल या आशेवर वृद्ध वडिलांनी उपाशीपोटी थंडीमध्ये तीन रात्री अंगणात काढल्या. 

मोठ्या मुलाकडे केले स्वाधीनअखेर नागरिकांकडून ही माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी धाव घेत मुलांशी संपर्क साधला असता मालमत्तेवरून वाद असल्याचे, शिवाय काकांनी आजोबांना सोडताना शिवीगाळ केल्याचे सांगून याप्रकरणी विवाहित नातीच्या तक्रारीवरून काकाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याे समजले. पोनि. कृष्णा शिंदे यांच्या आदेशाने पोहेकॉ संदीप घाडगे यांनी नगर जिल्ह्यातील मुलाला बोलावून घेत अखेर ३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता वृद्ध वडिलांना त्यांच्या स्वाधीन केले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWalujवाळूज