शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय रास्तारोको

By बापू सोळुंके | Updated: November 18, 2023 19:18 IST

यासोबतच मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांमध्ये मराठवाड्याची बाजू चांगल्या प्रकारे मांडण्यासाठी मराठवाडा पाणी हक्क् परिषदेने अर्ज दाखल केले

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी रोखून धरले आहे, यापार्श्वभूमीवर येथील जनतेच्या संतप्त भावनांचा आता उद्रेक होत आहे. २० नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय नेत्यांच्यावतीने सिंचनभवनसमोर जालना रोडवर रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री अनिल पटेल यांनी येथे सर्वपक्षीय नेत्यांच्या पत्रकार परिषदेत दिली.

अनिल पटेल म्हणाले की,अहमदनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत महसूलमंत्री विखे पाटील यांनी मराठवाड्याला पाणी न देण्याचा ठराव घेतला. अशा प्रकारे जिल्हा नियोजन समितीत ठराव घेता येत नाही, हे मंत्री विखे यांना माहिती नाही का, असा सवाल आमचा आहे. मराठवाड्यातील जनतेच्या हक्काचे ८.६ टीएमसी पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील विविध धरणांतून सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ३० ऑक्टोबर रोजी घेतला. या निर्णयाविरोधात नगर आणि नाशिककरांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. या दोन्ही याचिकांमध्ये न्यायालयाने पाणी सोडण्यास स्थगिती दिलेली नाही. असे असताना केवळ नगर आणि  नाशिक जिल्ह्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या दबावापुढे पाणी मिळू शकले नाही.

यामुळे आम्ही आता मराठवाडा पाणी जनआंदोलन उभारले आहे. २० नोव्हेंबर रोजी सिंचन भवनसमोर सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात येणार आहे. या आंदाेलनात माजीमंत्री राजेश टोपे, विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांच्यासह, सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे नेते सहभागी होणार आहेत. यासोबतच मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांमध्ये मराठवाड्याची बाजू चांगल्या प्रकारे मांडण्यासाठी मराठवाडा पाणी हक्क् परिषदेने अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी आ. डॉ.कल्याण काळे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा, शहर काँग्रेस अध्यक्ष शेख युसूफ, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती विलास भुमरे,  शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, रमेश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील, पांडुरंग तांगडे, व्यापारी महासंघाचे जगन्नाथ काळे, प्रा.आर.एम.दमगिर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण