शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

किसान सन्मान योजनेतील अपात्र लाभार्थींसाठी धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 14:15 IST

कन्नडमधील किसान सन्मान योजनेत १२५९ लाभार्थी  

ठळक मुद्देबोगस लाभार्थ्यांनी सव्वा कोटीचा घेतला लाभ 

कन्नड : तालुक्यातील काही जणांनी खोटी माहिती देऊन पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. अशा अपात्र लाभार्थींसाठी धोक्याची घंटा वाजत असून, संबंधितांना तलाठ्यांमार्फत तोंडी नुकत्याच सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी काही दिवसांत त्यांना नोटीस देण्यात येणार असून, घेतलेला लाभ परत जमा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. त्यामुळे अशा लाभार्थींचे धाबे दणाणले आहे.          शेतकऱ्यांना काही प्रमाणात का हाेईना दिलासा मिळावा या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान योजना आखली होती. यासाठी पात्र शेतकऱ्यांकडून ऑनलाईल अर्ज मागविण्यात आले होते. मात्र कन्नड तालुक्यातील काही जणांनी खोटी माहिती भरून लाभ घेण्याचा पुढे येत आहे. त्याअनुषंगाने आयकर विभागाने तालुक्यातील अशा एक हजार ६ लाभार्थींची माहिती संबंधित यंत्रणेला दिली आहे. या लाभार्थींचे आधार कार्ड लिंकिंग असल्याने त्यांची संपूर्ण माहिती शासनाकडे आहे. तसेच २५३ अपात्र लाभार्थींनीही लाभ मिळवला असल्याचे यातून उघड झाले. त्यात पती-पत्नीने एकत्रित लाभ घेणे यासह शासकीय नोकरदारांचा सुद्धा यात समावेश आहे. त्यामुळे अशा एक हजार २५९ लाभार्थींनी एकूण एक कोटी २१ लाख ७० हजार रुपयांचा लाभ पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून मिळवलेला आहे. या लाभार्थींना संबंधित तलाठ्यांमार्फत तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत. लाभापोटी मिळालेली रक्कम तात्काळ शासनाकडे जमा करावी अन्यथा त्यांच्या जमिनीवर बोजा टाकण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे. यासह खोटी माहिती दिल्याबद्दल संबंधिताविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.त्या लाभार्थींना बजावणार नोटीसपंतप्रधान सन्मान योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन भरताना अनेकांनी खोटी माहिती भरल्याचे उघड होत आहे. याेजनेला आधारशी जोडण्यात आल्याने लाभार्थींची सर्व माहिती शासनाकडे जमा झाली आहे. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करताना अनेकांनी शासनाची दिशाभूल करून अनुदान घेण्याचा प्रयत्न केल्याचे पुढे आले आहे. कन्नडसह औरंगाबाद जिल्ह्यात असे प्रकार झाले असून, महसूल विभागातर्फे अपात्र लाभार्थींकडून घेतलेला लाभ परत घेण्यात येत आहे. यासाठी संबंधितांना नोटीस बजाविण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयात सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.    

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagricultureशेती