छत्रपती संभाजीनगर : कधीकाळी हातात खेळणी घेऊन बागडणारी मुले आज हातात शस्त्रे, अमली पदार्थांचे सेवन करून रस्त्यांवर उतरत असल्याचे अस्वस्थ करणारे चित्र शहरात दिसत आहे. शहरात अशा १० महिन्यांत तब्बल ११३ अल्पवयीन मुलांची गुन्हेगार म्हणून नोंद झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रत्येक १० गंभीर गुन्ह्यांमागे दोन गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग निष्पन्न होत आहे. यात प्रामुख्याने लूटमार, छेडछाडीसह प्राणघातक हल्ल्यांच्या गुन्ह्यात याचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नोंदवले.
सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, कमी वयात हातात आलेले मोबाइल व आई-वडिलांच्या दुर्लक्षामुळे कमी वयातच मुले डॉन, भाई बनण्याचा नवा ट्रेेंड रुजत असल्याचे वारंवार दिसत आहे. सिडको, मुकुंदवाडी, पुंडलिकनगर, जवाहरनगर, जिन्सी भागांत गेल्या १० महिन्यांत लूटमारीच्या घटनांनी नवा विक्रम रचला. पोलिसांच्या माहितीनुसार, यातील ७० टक्के घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. सुसाट दुचाकीवर फिरत लूटमार करून मिळालेल्या पैशांतून ही मुले नशेवर खर्च करतात. मात्र, कायद्याच्या बंधनामुळे त्यांना अटक करता येत नसल्याने बालगृहात पाठवावे लागते. त्यामुळे त्यांना शिक्षेची भीती नसल्याचे मत पोलिसांनी नोंदवले.
धक्कादायक : दहा महिन्यांत ९० गुन्ह्यांत १०५ गुन्हेगार अल्पवयीनपोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या दहा महिन्यांत १७ पोलिस ठाण्यांत नोंदवलेल्या गेलेल्या ११३ गंभीर गुन्ह्यांत १०५ गुन्हेगार अल्पवयीन आहेत. त्यांतील जवळपास ७० पेक्षा अधिक सवयीचे गुन्हेगार होते; तर उर्वरित नशेखोरी, चुकीच्या संगतीतून पहिल्यांदाच गुन्ह्यात अडकून पोलिसांच्या रेकॉर्डवर आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुन्ह्यांचा प्रकार – टक्केवारीलूटमार – ३३.३३ टक्केप्राणघातक हल्ले – २५.७१ टक्केदुचाकी चोरी – १८.०९ टक्केघरफोडी – १३.३३ टक्केइतर गुन्हे – ९.५२ टक्के
बालगुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरनॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्यूरोच्या २०२३ च्या अहवालानुसार, राज्यात खून, अपहरण, बलात्कार, लूटमार, इ. गुन्ह्यांत १,६७५ अल्पवयीन मुलांची नोंद झाली. मध्य प्रदेश (२,०३४) खालोखाल महाराष्ट्र बालगुन्हेगारीत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे; तर संपूर्ण बीएनएस कायद्यांतर्गत ३,५४८ प्रकरणांत अल्पवयीन मुले आरोपी निघाली.
समुपदेशन, पुनर्वसन महत्त्वाचेअल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळणे ही गंभीर बाब आहे. मात्र, त्याहीपेक्षा त्यानंतर त्यांचे समुपदेशन, पुनर्वसन महत्त्वाचे असते. पोलिस विभाग सातत्याने त्यासाठी प्रयत्नशील आहे. निष्पन्न अल्पवयीन मुलांच्या पालकांनाही आम्ही कळवतो. शिवाय, कायद्यातील तरतुदींचा वापर करून त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करतो. यात पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरते.- रत्नाकर नवले, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा.
कुटुंबाची जबाबदारी अधिकअनेक मुलांना भावनिक दृष्टिकोनातून पाठिंबा मिळत नाही. आधी ती शिक्षणापासून दुरावतात आणि क्रमाने त्यांच्या चांगल्या गुणांना प्रोत्साहन मिळत नाही. कुटुंबातील वातावरण, आईवडिलांमधील बेबनाव, भावनिक धागा नसल्याने मुले चुकीच्या संगतीकडे आकर्षिली जातात. बालगुन्हेगारी वाढण्यामागे कुटुंबाचीच जबाबदारी अधिक असते.- डॉ. संदीप सिसोदे, मानसोपचारतज्ज्ञ
Web Summary : Chhatrapati Sambhajinagar sees a surge in juvenile crime. Over ten months, 113 minors were involved in serious offenses like robbery and assault, often fueled by addiction and lack of parental supervision, highlighting a concerning trend.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में किशोर अपराध बढ़ रहा है। दस महीनों में, 113 नाबालिग डकैती और हमले जैसे गंभीर अपराधों में शामिल थे, जो अक्सर लत और माता-पिता की देखरेख की कमी से प्रेरित थे, जो एक चिंताजनक प्रवृत्ति को उजागर करता है।