शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार जाहीर करीत राष्ट्रवादीची (अप) छत्रपती संभाजीनगरात वेगळी चूल; महायुतीपासून दूर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:42 IST

राष्ट्रवादी अ. प. गटाने उमेदवार जाहीर केल्यामुळे महायुतीच्या पहिल्या बैठकीला दिले नाही निमंत्रण

छत्रपती संभाजीनगर : महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात महायुतीच्या चर्चेत सहभागी होण्यापूर्वीच थेट वेगळी चूल मांडत काही उमेदवार जाहीर करून टाकल्यामुळे ते युतीमध्ये सामील न होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी वेगळी चूल मांडल्यामुळेच मंगळवारी भाजप व शिंदेसेनेच्या बैठकीला त्यांना निमंत्रित केले नसल्याचे महायुतीने स्पष्ट केले. तर दुसरीकडे रिपाइं आठवले गटाला देखील पहिल्या महायुतीच्या पहिल्या बैठकीचे निमंत्रण नसल्याने तेही नाराज झाले आहेत.

शहरातील एका हॉटेलमध्ये युतीत लढण्याच्या अनुषंगाने पहिली बैठक झाली. बैठकीत आ. प्रदीप जैस्वाल, ऋषिकेश जैस्वाल, राजेंद्र जंजाळ हे शिंदेसेनेकडून तर भाजपकडून शहराध्यक्ष किशोर शितोळे, माजी महापौर बापू घडमोडे, प्रशांत देसरडा, समीर राजूरकर यांची उपस्थिती होती.

परवा पुन्हा बैठकसामाजिक समीकरणासह काही प्रभागांवर चर्चा झाली. महायुतीमध्येच निवडणूक लढायची आहे, हे निश्चितपणे ठरले. विरोधकांना लाभ होईल, असा कोणताही निर्णय महायुतीच्या वाटाघाटीत होऊ नये, यावर चर्चा झाली. मंगळवारच्या पहिल्या बैठकीला मंत्री, खासदार उपस्थित नव्हते, त्यामुळे उद्या किंवा परवा पुन्हा बैठक होईल. रा.काँ. अजित पवार गटाकडून प्रतिसाद मिळाला नाही, परंतु त्यांना दोन दिवसांपूर्वी मुस्लिमबहुल भागातील प्रभागांतून उमेदवार द्या, असे सुचविले होते.-किशोर शितोळे, भाजप शहराध्यक्ष

विधानसभेत काम केल्याचे फळ असे देताहेतपहिल्या बैठकीचे काहीही निमंत्रण नव्हते. उमेदवार जाहीर केले म्हणजे, आम्हाला आमच्या बैठकीत सांगावे लागेल की, हे उमेदवार येथून लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि आम्ही लढावे, अशी त्यांची इच्छा असेल तर ठीक आहे. आम्हाला निमंत्रण दिले तर जाऊ अन्यथा नाही. भाजप स्वत:ला मोठा भाऊ समजत असेल, तर आम्हा लहान भावांना त्यांनी बोलवावे. विधानसभेत त्यांच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या मेहनतीचे असे फळ देत आहेत.-अभिजित देशमुख, शहराध्यक्ष, अजित पवार गट

राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केलेराष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चर्चा न करताच उमेदवार जाहीर करीत असतील, तर लक्षात येत आहे की, त्यांना काय करायचे आहे. त्यांनी एक-दोन उमेदवार जाहीर केले. त्यांच्या डोक्यात आमच्यासोबत यायच्या ऐवजी दुसरा काहीतरी विचार सुरु असेल. मंगळवारच्या पहिल्या बैठकीत महायुती करण्यावर एकमत आहे. जागावाटपाचा समन्यायाने निर्णय होईल.पुढील दोन दिवसांत बैठका होतील....राजेंद्र जंजाळ, शिंदेसेना जिल्हाप्रमुख

आम्ही देखील उद्या उमेदवार जाहीर करूमहायुतीच्या प्राथमिक बैठकीसाठी आम्हाला निमंत्रण नव्हते. आमच्या पक्षाची बुधवारी बैठक आहे. त्यांना आम्हाला सोबत घ्यायची इच्छा नसेल तर आम्हीदेखील बुधवारी उमेदवार जाहीर करू....नागराज गायकवाड, रिपाइं (आ), शहराध्यक्ष

English
हिंदी सारांश
Web Title : NCP's solo path sparks Mahayuti doubts in Chhatrapati Sambhajinagar.

Web Summary : Ajit Pawar's NCP declared candidates independently, raising doubts about Mahayuti unity in Chhatrapati Sambhajinagar. BJP and Shinde Sena proceeded without inviting NCP, while RPI (Athawale) also expressed discontent over exclusion from initial talks, hinting at potential independent candidacies.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकChhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६NCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुती