शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पैसे कमी पडू देणार नाही, पाणीप्रश्न सोडवला का? छ. संभाजीनगरच्या विकासाबद्दल अजितदादांमध्ये प्रचंड तळमळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 16:50 IST

Ajit Pawar Death: मी कोणाला घाबरत नाही, तूसुद्धा अशाच पद्धतीने काम कर असे म्हणून ते मला ऊर्जा देण्याचे काम करीत आले.

- जी. श्रीकांत, आयुक्त तथा प्रशासक, छत्रपती संभाजीनगर महापालिकाछत्रपती संभाजीनगर : महापालिका प्रशासक म्हणून काम करताना अनेकदा अजितदादांना भेटण्याचा योग आला. त्यांचे छत्रपती संभाजीनगर शहरावर असलेले प्रेम, जिव्हाळा, कळवळा प्रत्येक वेळी दिसून येत होता. सर्वांत अगोदर ते एकच प्रश्न करीत असत. श्रीकांत शहराचा पाणीप्रश्न सोडवला का रे? मी त्यांना नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम कुठपर्यंत आले ते सांगत असे. रस्ता रुंदीकरण मोहीम राबविली तेव्हासुद्धा त्यांनी कौतुक केले. मी कोणाला घाबरत नाही, तूसुद्धा अशाच पद्धतीने काम कर असे म्हणून ते मला ऊर्जा देण्याचे काम करीत आले. त्यांच्या अकाली जाण्याचे राज्याचे मोठे नुकसान झाले.

दादा १७ सप्टेंबर २०२४ रोजी स्मार्ट सिटीच्या कार्यालयात आले. ७५० सीसीटीव्हीचे कमांड सेंटर, कचरा संकलन पद्धत, शाळेत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले सावित्री कक्ष, आदी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम पाहून ते भारावून गेले. या उपक्रमांंची माहिती घेण्यासाठी बारामतीहून अधिकाऱ्यांचे एक पथक पाठविले. शहरात एक चांगले स्कील सेंटर असावे अशी इच्छा त्यांनी अनेकदा बोलून दाखविली. शहर स्वच्छ व सुंदर असावे, रस्ते अतिक्रमणमुक्त असावेत ही त्यांची इच्छा होती. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दादांनी तसे बोलूनही दाखविले. डीपीडीसीची बैठक असो किंवा मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक असो, पाहताच क्षणी श्रीकांत काय झाले रे... असे म्हणत संवाद पुढे सुरू होत होता. त्या ‘रे’ या एकमेव शब्दात प्रचंड आपुलकीचा भाव असायचा. सकाळी ७ वाजेपासून कामाला सुरू करणे ही पद्धत मला खूप आवडत होती. त्यामुळे मीसुद्धा सकाळीच बैठका घेणे सुरू केले. माझ्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी एकदा गेलो असता त्यांनी आस्थेवाईकपणे सर्व चौकशी केली. लग्नाला येता येणार नाही, हेसुद्धा सांगितले आणि शुभेच्छा दिल्या.

सोबत जेवण केले...आ. सतीश चव्हाण यांच्या घरी त्यांच्यासोबत केलेले जेवण ही माझी व त्यांची शेवटची भेट ठरली. तेव्हाही त्यांनी रस्ता रुंदीकरण मोहिमेचे कौतुक केले. आज तुझ्यावर आरोप होत असले तरी काही हरकत नाही. उद्या हेच लोक तुझी स्तुती करतील, असे दादा म्हणाले होते. या भेटीतही त्यांनी पाणी योजना कुठपर्यंत आली, शहराला पाणी कधी मिळेल असे विचारले. योजनेला पैसे कमी पडणार नाहीत असे आश्वासनही दिले होते.(शब्दांकन- मुजीब देवणीकर)

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Dada's concern for Chhatrapati Sambhajinagar's development and water issues.

Web Summary : Ajit Dada prioritized solving Chhatrapati Sambhajinagar's water issues and infrastructure. He consistently inquired about the water supply project's progress, offering support and resources. His dedication to the city's development was evident in his interactions and encouragement.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर