शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे धाडस!; बकऱ्यांसाठी दुसऱ्यांदा वाड्यात शिरताच बिबट्याला केलं बंदिस्त, मादी पसार

By साहेबराव हिवराळे | Updated: March 16, 2026 19:54 IST

बकऱ्यांच्या शिकारीसाठी दुसऱ्यांदा आला अन् अडकला; ग्रामस्थांनी वाड्याची कडी लावून बिबट्याला केले जेरबंद

छत्रपती संभाजीनगर : अजिंठा वनपरिक्षेत्रातील अंधारी शिवारात शनिवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ग्रामस्थांचे धाडस आणि वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे वाड्यात अडकलेल्या नर बिबट्याला रविवारी पहाटे सहाच्या सुमारास जेरबंद करण्यात पथकाला यश आले.

दोन दिवसाांपुर्वी वाड्यात शिरून चार बकऱ्यांचा फडशा पाडल्यानंतर दुसऱ्यांदा जाऊन बकऱ्यांवर ताव मारण्यासाठी बिबट्या आला होता. ही घटना १४ मार्च रोजी रात्री सुमारे ११:३० वाजता घडली. अंधारी गावातील शेतकरी युसूफ खान अय्युब खान यांच्या शेतातील वाड्यात नर-मादी बिबट्यांची जोडी शिरली. पण दोन दिवसांपुर्वी घडलेल्या घटनेनंतर शेतकरी युसूफ खान यांनी वाड्यातील बकऱ्या इतर ठिकाणी बांधल्या होत्या. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, काही ग्रामस्थांनी धाडस दाखवत तत्काळ वाड्याच्या दरवाजाला कडी लावल्याने बिबट्याला आतच बंदिस्त झाला. यादरम्यान मादी बिबट्या बाहेर पडली. खबरदारी म्हणून ग्रामस्थांनी लगेच याबाबत वनविभागाला याबाबत माहिती कळवली.

या घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक सुवर्णा माने आणि सहायक वनसंरक्षक स्वप्नील भामरे यांनी वाड्यात अडकलेल्या बिबट पकडण्यासाठी पथकाला सूचना दिल्या. वनविभागाच्या पथकाने रात्रीच घटनास्थळी धाव घेतल्यानंतर रविवारी पहाटे सुमारे सहाच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने वाड्यात अडकलेल्या नर बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद केले. यासाठी पथकाने वाड्याच्या दरवाजासमोर मोठा पिंजरा लावला होता. या कारवाईमुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीही याच ठिकाणी बिबट्याने बकऱ्यांवर हल्ला केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्याच बिबट्यांच्या जोडीने पुन्हा त्या ठिकाणी आल्यावर नर बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात अडकला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके, कर्मचारी, तसेच युसूफ खान अय्युब खान, सादिक खान मेवाती, आदिल खान मेवाती, सलीम खान मेवाती, शकील खान मेवाती, उमर खान मेवाती यांच्यासह सुमारे २५ ते ३० ग्रामस्थ उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Brave Farmers Trap Leopard After Second Attack; Female Escapes

Web Summary : Farmers in Chhatrapati Sambhajinagar bravely trapped a male leopard in a shed after it returned to attack goats. The female escaped. Forest officials captured the leopard, bringing relief to villagers after previous attacks.
टॅग्स :leopardबिबट्याchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरforestजंगल