औरंगाबाद : इसिस या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी निघालेल्या तिघा तरुणांना नागपूर विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर प्रत्येक विमानतळावर सतर्कतेची सूचना देण्यात आली असून, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरही सतर्कता बाळगली जात आहे. प्रत्येक प्रवाशावर करडी नजर ठेवली जात आहे.विमानतळ प्राधिकरण आणि ‘सीआयएसएफ’तर्फे विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यात आली आहे. चिकलठाणा विमानतळावरून मराठवाड्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. विमानतळावर कायम सुरक्षा व्यवस्था चोख असते. आंतरराष्ट्रीय विमानसेवा असल्यावर अधिक काळजी घ्यावी लागते. इसिस संघटनेत सहभागी होण्यासाठी निघालेल्या तरुणांना नागपूर विमानतळावर ताब्यात घेण्यात आले, अशा परिस्थितीमुळे सतर्कता बाळगली जात असल्याचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
विमानतळावर ‘अलर्ट’
By admin | Updated: December 28, 2015 23:51 IST