शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या मध्यभागी येणार एअर व्हॉल्व्ह; नॅशनल हायवे अथॉरिटी सांगा, वाहतूक कशी सुरू राहील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 19:38 IST

मार्किंगच्या केंद्रभागी एअर व्हॉल्व्ह येत असेल, तर रस्ता किती शिल्लक राहणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतोय.

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ३४ किमी २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. आता या जलवाहिनीवर ठिकठिकाणी एअर व्हॉल्व्ह बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वीच रस्त्यावर मार्किंग केली. एअर व्हॉल्व्हचे सेंटर रस्त्याच्या मध्यभागी येत आहे. व्हॉल्व्हच्या चारही बाजूंनी सुरक्षित सिमेंटच्या भिंती उभारण्यात येणार आहेत. अशा परिस्थितीत रस्त्यावरून वाहतूक कशी सुरळीत राहील, याचे उत्तर नॅशनल हायवेकडे नाही.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीवर रस्ता तयार करण्याचा प्रताप नॅशनल हायवेने केला. उलट औरंगाबाद खंडपीठात शपथपत्र देण्यात आले, त्यात जलवाहिनी रस्त्यात येत असल्याचे म्हटले आहे. ‘लोकमत’ ने ८ दिवसांपासून या विषयावर वृत्तमालिका सुरू केली आहे. या प्रकरणात रोज वेगवेगळ्या बाजू समोर येत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला नॅशनल हायवेने आखून दिलेल्या जागेतच २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. त्यावर एअर व्हॉल्व्हसुद्धा येणार आहेत, हेही नॅशनल हायवेला कळविण्यात आले होते. त्याचे नकाशेही सादर करण्यात आले. त्यानंतरही नॅशनल हायवेने अलीकडेच जलवाहिनीवर रस्ता तयार केला. मजीप्राने उर्वरित जलवाहिनीचे काम पूर्ण करणे आणि युद्धपातळीवर एअर व्हॉल्व्ह बसविण्याचे काम सुरू केले. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच मार्किंगही करण्यात आली. या भागातील जागरूक नागरिकांनी मार्किंगची छायाचित्रे ‘लोकमत’ला उपलब्ध करून दिली. मार्किंगच्या केंद्रभागी एअर व्हॉल्व्ह येत असेल, तर रस्ता किती शिल्लक राहणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतोय. एअर व्हॉल्व्हच्या चारही बाजूंनी सिमेंटचे बांधकाम येईल. १२ बाय १२ फुटांचे हे बॉक्स बांधकाम राहील. जलवाहिनीवर एकूण ८ ठिकाणी असे मोठे एअर व्हॉल्व्ह बसविले जातील. या शिवाय ८० ठिकाणी बटर फ्लाय व्हॉल्व्ह राहतील.

सेंटर अलाइनमेंट चुकीची३० मीटरच्या रस्त्यात ८ मीटर जागा जलवाहिनीसाठी देण्यात आली होती. २२ मीटर जागा नॅशनल हायवेकडे रस्त्यासाठी शिल्लक होती. तेवढ्याच जागेत रस्ता केला असता, तर सेंटर अलाइनमेंट ११ मीटरवर आले असते. आता नॅशनल हायवेने दुभाजक १५ मीटरवर ठेवले आहेत. त्यामुळे एका बाजूला रस्ता लहान होईल.

जलवाहिनीचे डिझाइन ३० वर्षांचेनॅशनल हायवेने पुढील १५ वर्षे डोळ्यासमोर ठेवून रस्ता डिझाइन केला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुढील ३० वर्षे शहराची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून जलवाहिनी डिझाइन केली आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMuncipal Corporationनगर पालिकाhighwayमहामार्ग