शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सिंगापूर, बँकाॅकसाठी छत्रपती संभाजीनगरातून ‘हवा हवाई’; एअर एशिया घेणार ‘टेकऑफ’

By संतोष हिरेमठ | Updated: March 27, 2024 19:30 IST

मलेशियातील एअर एशिया विमान कंपनीने या वर्षअखेरपर्यंत देशातील सहा शहरांमधून उड्डाण सुरू करण्याचे नियोजन काही दिवसांपूर्वी केले आहे.

छत्रपती संभाजीनगर : शहरातून लवकरच एअर एशिया विमान कंपनीकडून सिंगापूर आणि बँकॉक या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. विमानतळ प्राधिकरणाची यासंदर्भात कंपनीसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरातून थेट सिंगापूर, बँकॉकसाठी विमान उपलब्ध झाल्यास पर्यटन आणि उद्योगाचे ‘टेकऑफ’ होण्यास चालना मिळणार आहे.

मलेशियातील एअर एशिया विमान कंपनीने या वर्षअखेरपर्यंत देशातील सहा शहरांमधून उड्डाण सुरू करण्याचे नियोजन काही दिवसांपूर्वी केले आहे. या ६ शहरांमध्ये जयपूर, विशाखापट्टणम, अहमदाबाद, पाटणा, कालिकत आणि छत्रपती संभाजीनगरचा समावेश असल्याचे समोर आले आहे. एअर एशियाकडून क्वालालंपूर-मलेशिया, तसेच सिंगापूर, बँकाॅकसाठी विमानसेवा सुरू करण्याची शक्यता आहे. चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीशी प्राथमिक चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात लवकरच अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे.

'इमिग्रेशन'ची प्रतीक्षाविमानतळाला 'कस्टम'ची सुविधा मिळालेली आहे. मात्र, 'इमिग्रेशन'च्या सुविधेची अद्याप प्रतीक्षा आहे. यासंदर्भात गेल्या अनेक वर्षांच्या कालावधीपासून ‘इमिग्रेशन’साठी प्राधिकरणाकडून संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला. आता लवकरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली इमिग्रेशनची सुविधा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या दृष्टीने चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाकडून पाठपुरावा सुरू आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादairplaneविमान