शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत घरात खून; पतीने दारूच्या नशेत झोपलेल्या पत्नीला डोक्यात लाकूड घालून संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 13:17 IST

पैठण तालुक्यातील घटना; दारूड्या आरोपीस केली अटक

पाचोड: दिवसभर दारू पिऊन रात्री घरी आल्यानंतर स्वयंपाक न बनविल्याने रागाच्या भरात झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात लाकडाने जोरदार प्रहार करून तिचा खून केल्याची घटना पैठण तालुक्यातील हर्षी येथे रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. प्रियंका श्रीराम वाघ ( ३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

हर्षी येथील श्रीराम वाघ हा सेंट्रिंगकाम करत होता. दारूचे वेसन असल्याने त्याने काही दिवसांपूर्वी हे कामही सोडले होते. त्यामुळे त्याचा पत्नी प्रियंकासोबत नेहमी वाद होत होता. रविवारी एकीकडे सर्वत्र लक्ष्मीपूजनाचा दिवस असताना श्रीराम वाघ हा दिवसभर दारू पिऊन तर्रर होता. त्यामुळे प्रियंकाने माहेरी आईला फोन करून आज सणाच्या दिवशीही श्रीराम दारू पिऊन फिरत असल्याचे सांगितले. त्यांनी १३ वर्षीय मुलगी व ७ वर्षाचा मुलगा यांना दिवाळीसाठी माहेरी पाठविले होते. त्यामुळे प्रियंकाने रात्री घरात स्वयंपाकच केला नाही.

दिवसभर बाहेर फिरून श्रीराम वाघ हा रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घरी आला. त्यावेळी त्याला घरात स्वयंपाक केला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे तो रागात हातात लाकूड घेऊन पत्नी प्रियंका झोपलेल्या खोलीत गेला. त्यानंतर स्वंयपाक का केला नाही, म्हणून झोपेतच तिच्या डोक्यात लाकडाने जोरदार प्रहार केला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मित्राचे वाहन बोलावून घेत त्यामध्ये टाकून पत्नीचा रक्तबंबाळ झालेला मृतदेह घेऊन तो पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात रात्री ९.३० वाजता दाखल झाला. येथे त्याने पत्नी दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने जखमी झाल्याचे सांगितले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब घुगे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सपोनि संतोष माने कर्मचाऱ्यांसह रूग्णालयात दाखल झाले. यावेळी आरोपीने सांगितलेल्या माहितीबाबत पोलिसांना संशय आला. कारण मयत महिलेल्या डोक्यात गंभीर जखमा दिसून आल्या. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता सुरूवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर घटनास्थळी श्वानासह आरोपीस नेण्यात आले. तेथे श्वानाला रक्त असलेले लाकूड दिसले. त्यानंतर लाकडास हुंगून श्वान आरोपीच्या जवळ जाऊन थांबले. त्यामुळे पोलिसांचा संशय पक्का झाला.

मृत विवाहितेचे नातेवाईक आक्रमकइकडे मृत विवाहितेचे माहेरकडील नातेवाईक दवाखान्यात दाखल झाले. त्यांनी आरोपीवर जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करून त्यांची समजूत काढली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता मृत प्रियंकाच्या भाऊ सचिन पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी श्रीराम वाघ याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास सपोनि संतोष माने, उपनिरीक्षक नितीन काकरवाल, जमादार अण्णासाहेब गव्हाणे, पवन चव्हाण करत आहेत. दरम्यान,मृत प्रियंकाच्या पार्थिवावर सायंकाळी हर्षी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रियंकाच्या पश्चात सासरे, सासू, नवरा, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद