शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

'ज्याला घरातूनच बाहेर काढलं, त्याला काय उत्तर द्यायचं'; ओवैसींची राज ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 21:08 IST

देशात आज द्वेषपूर्ण भाषेचा वापर केला जात आहे, मात्र अकबरुद्दीन ओवैसी द्वेषाचं उत्तर द्वेषाने नाही तर प्रेमाने देईल, असंही अकबरुद्दीन ओवैसी यांनी सांगितले.

औरंगाबाद- कुत्रे भुंकत आहेत, भुंकणाऱ्या कुत्र्यांना भुंकू द्या. कुत्रे भुंकत असतात. पण, वाघ शांतपणे निघून जात असतो. ते जाळं विणत आहेत, तुम्ही त्यात फसायचं नाही. आपण कायदा हातात घ्यायचा नाही, असं एमआयएमचे आमदार आणि नेते अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले. त्यांनी आज औरंगाबादमधील जनेतला संबोधित केले. आपल्या भाषणाच्या शेवटी हिंदुस्तान झिंदाबाद असे म्हणत, हा देश जेवढा तुमचा आहे, तेवढाच आमचाही आहे, म्हटले. या देशात आपण प्रेमानं राहूयात, असेही अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले.

अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले की, मी येथे कोणाला उत्तर द्यायला आलो नाही. मी कोणाला वाईट बोलायला आलो नाहीय. तसं करण्याची मला गरज देखील नाही. आमचा तर एक खासदार आहे. तुम्ही तर बेघर आहे. तुम्हाला काय उत्तर देणार. ज्याला घरातून बाहेर काढलं आहे, त्याला काय उत्तर द्यायचं, असं अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले. 

देशात आज द्वेषपूर्ण भाषेचा वापर केला जात आहे, मात्र अकबरुद्दीन ओवैसी द्वेषाचं उत्तर द्वेषाने नाही तर प्रेमाने देईल, असंही अकबरुद्दीन ओवैसी यांनी सांगितले. तसेच कुणाला घाबरण्याची गरज नाही. ज्याला कुणाला वाटत असेल आम्ही घाबरू पण ऐकून घ्या, आम्ही घाबरणार नाही. इस्लाम आधी संपला नाही, मग आता कोण संपवणार?, असा सवाल करत अकबरुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

दरम्यान, अजानचा विषय आहे, मॉब लिंचींगचा आहे, हिबाजचा विषय आहे. मात्र, आम्ही कुणालाही घाबरत नाही. औरंगाबाद ही अल्लाहची सरजमीन आहे. जर वेळच आली तर, जीवाची बाजी लावू आणि मरणाऱ्यांच्या यादीत सर्वात पुढे अकबरुद्दीन ओवैसी असेल, असे म्हणत औरंगाबादमधील जनतेला न घाबरण्याचे आवाहन औवेसी यांनी केलं. 

ओवैसींने घेतले औरंगजेब याच्या कबरीचे दर्शन

अकबरुद्दीन औवेसी यांनी आज दुपारी खुलताबाद येथील विविध दर्गेला भेट देवून दर्शन घेतले. मात्र, त्यांनी यावेळी औरंगजेब याच्या कबरीचे दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, आजवर कोणीच या कबरीचे दर्शन घेतले नाही, मात्र एमआयएमच्या नेत्यांनी दर्शन घेऊन नवीन राजकारणाची पद्धत रूढ करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनMNSमनसेAurangabadऔरंगाबाद