शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अहो आश्चर्यम्... औरंगाबादेत तिहेरी रेल्वेमार्ग आहे अन् आता चौथा मार्ग प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 19:54 IST

Railway in Aurangabad राष्ट्रीय रेल्वे योजनेतील घोळ; मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे मार्गातून औरंगाबादचा पत्ता पुन्हा कट

ठळक मुद्देमराठवाड्यात वर्षानुवर्षे दुहेरीकरणाची प्रतीक्षा कागदोपत्री थेट तिहेरी रेल्वे मार्ग  दाखविण्याची किमया

औरंगाबाद : औरंगाबादेत तिहेरी रेल्वे मार्ग आहेत, हो तिहेरीच. आणि आता चौथा रेल्वे मार्गही प्रस्तावित आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण रेल्वे बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या नव्या राष्ट्रीय रेल्वे योजनेच्या (एनपीआर) मसुद्यात ही बाब नमूद करण्यात आली आहे. वर्षानुवर्षे दुहेरीकरणाची प्रतीक्षा करणाऱ्या मराठवाड्यात कागदोपत्री थेट तिहेरी रेल्वे मार्ग  दाखविण्याची किमया रेल्वेने केली आहे.

मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर, सचिव प्रल्हाद पारटकर आणि स्वानंद सोळुंके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत या मसुद्यासाठी कन्सल्टन्सीने कागदोपत्री केलेले सर्वेक्षण आणि  त्रुटींमुळे मराठवाड्यावर अन्याय झाल्याचे नमूद केले. बोरकर म्हणाले, रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी १६ डिसेंबर रोजी आगामी ३० ते ४० वर्षांचा ‘एनपीआर’ प्रसिद्ध केला. क्षमता असूनही यात मराठवाड्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ‘एनपीआर’मध्ये मागास भाग आणि औद्योगिक क्षेत्राशी कनेक्टिव्हिटी यासंदर्भातील माहितीत औरंगाबादला तिहेरी रेल्वे मार्ग असल्याचे आणि चौथा मार्ग प्रस्तावित असल्याचे नमूद केले आहे. एकेरी मार्ग असताना तिहेरी मार्ग दाखवून रेल्वेने जनतेची फसवणूक केली आहे. मल्टिमाॅडेल पॅसेंजर टर्मिनलविषयाच्या माहितीत प्रवाशांच्या संख्येनुसार पहिली २४ रेल्वेस्टेशन दाखविण्यात आले. यात औरंगाबादचा समावेश नाही. मात्र, बुलडाण्याचा आहे. तेथे स्थानकच नाही. तरीही २ लाखांहून अधिक प्रवासी दाखविण्यात आले. 

रेल्वे अधिकाऱ्यांकडून खासदारांची फसवणूकमुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे मार्गाला औरंगाबाद, जळगाव या शहरांना वगळून दाखविण्यात आले आहे. हा मार्ग औरंगाबादमार्गे जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकारी खासदारांना देतात आणि दस्तऐवजात मात्र औरंगाबादला वगळण्यात येते. याचा जाब खासदारांनी विचारला पाहिजे. शिवाय हा मार्ग २०५१ पर्यंत कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, अशीही माहिती बोरकर यांनी दिली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेMarathwadaमराठवाडाtourismपर्यटन