शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात परीक्षा संचालकांच्या दालनात गोंधळ; विद्यार्थी नेत्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 13:46 IST

विद्यापीठात विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होण्याची दुसरी वेळ

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांच्या दालनात गोंधळ घातल्या प्रकरणात विद्यार्थी नेत्यावर तब्बल २४ दिवसांनंतर शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा बेगमपुरा पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. १७) दाखल करण्यात आला. परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांनी फिर्यादी दिली आहे. आरोपीमध्ये डॉ. प्रकाश इंगळे यांचा समावेश आहे. 

विद्यापीठाच्या प्रभारी परीक्षा संचालक डॉ. गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २४ जून रोजी त्या पदवी परीक्षांचा निकाल लावण्यासंदर्भात गोपनीय बैठक घेत होत्या. तेव्हा डॉ. इंगळे यांनी विनापरवानगी त्यांच्या दालनात प्रवेश करत जोरजोरात आरडाओरड करून भीतीचे वातावरण निर्माण करत बैठकीत अडथळा आणला. मागील अनेक दिवसांपासून तक्रार कोणी करायची, यावरून विद्यापीठाच्या प्रशासनात खल सुरू होता. सुरक्षारक्षक, कुलसचिवांना फिर्याद देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यांनी तक्रार देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर थेट परीक्षा संचालकांनीच तक्रार दिली.

दुसऱ्यांदा गुन्हे दाखलविद्यापीठात कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तोंडाला भगवे कापड गुंडाळून आलेल्या दुचाकीस्वारांनी धुडगूस घातला होता. त्याविरोधात कुलगुरूंच्या दालनाबाहेर विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले होते. त्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदविले होते. त्यानंतर विद्यापीठात आंदोलन करण्यासाठी पोलिसांची नव्हे, तर विद्यापीठाची परवानगी बंधनकारक केली. त्यानंतर आता विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला.

विद्यापीठ बनले आंदोलनाचे केंद्रविद्यापीठात राेजंदारी कर्मचाऱ्यांनी मागील नऊ दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यानंतर शनिवारी बेराेजगार युवकांसह प्राध्यापकांनी विद्यापीठावर विराट मोर्चा काढला होता. काही दिवसांपूर्वी एसएफआय संघटनेतर्फे मोठे आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यामुळे विद्यापीठ सध्या आंदोलनाचे केंद्र बनत चालले आहे.

सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजेगुन्हा दाखल झाल्याची माहिती आपल्याकडूनच समजली. परीक्षा संचालकांच्या कार्यालयात गोंधळ घातला असेल तर तेथील सीसीटीव्ही फुटेज समोर आणले पाहिजे. विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होत नसल्याने परीक्षा संचालकांना विनंती करण्यासाठी गेलो होतो. त्यावरून आता गुन्हे दाखल होत आहेत.- डॉ. प्रकाश इंगळे, विद्यार्थी नेता

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र