शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

पैठणमध्ये अघोरी कृत्य ! मंदिरात आढळला युवकाचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 20:36 IST

Crime News Aurangabadअंधश्रद्धेतून हे अघोरी कृत्य झाले असावे असा संशय

ठळक मुद्देतरूणाचा मृतदेह महादेवाच्या पिंडीलगत असल्याने पिंड रक्ताने माखून निघालेली होती. मंदिरात पोलिसांना धारदार कटरचा एक तुकडा सापडला आहे

पैठण : शहरातील गंगेश्वर महादेव मंदिरात कहारवाडा येथील रहिवाशी असलेल्या २५ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने गळा चिरलेला मृृृतदेह गुरुवारी सायंकाळी आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.  तरूणाचा मृतदेह महादेवाच्या पिंडीलगत असल्याने पिंड रक्ताने माखून निघालेली होती. यामुळे हे अघोरी कृत्य अंधश्रद्धेतून झाले असावे अशी चर्चा होत आहे. पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवला असून परिसर सील करून तपास सुरू केला आहे.

पैठण शहरातील जुने कावसन येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास सुरू असताना  पुन्हा एका घटनेने आज पैठण शहर  हादरले आहे. गोदावरी काठालगत असलेल्या गंगेश्वर महादेव मंदीरात गुरूवारी सायंकाळी पैठण शहरातील कहारवाडा येथील रहिवाशी नंदू देविदास घुंगासे वय २५ वर्ष या युवकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदाम वारे, फौजदार रामकृष्ण सागडे, यांनी घटनास्थळी जाऊन तातडीने तरूणाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवला. महादेवाच्या पिंडीला बिलगून गुडघ्यावर बसलेल्या अवस्थेत असलेल्या मृतदेहाचे रक्त पिंडीवर पडत होते. मंदिरात पोलिसांना धारदार कटरचा एक तुकडा सापडला असून याच कटरने हत्या किंवा आत्महत्या करण्यात आली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान नंदू घुंगासे हा पैठण मच्छी मार्केटमध्ये मासे विक्रीचा व्यवसाय करत होता. परंतु, वर्षभरापूर्वी मासेविक्री बंद करून मासे पकडण्याचे जाळे विकण्याचा व्यवसाय त्याने सुरू केला असे कहारवाडा प्रभागाचे नगरसेवक बजरंग लिंबोरे यांनी सांगितले. मयत नंदूची आई व नंदू या महादेवाचे भक्त होते. नंदूची आई नियमितपणे महादेव मंदिरात येत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. नंदूही अधूनमधून गंगेश्वर मंदीरात दर्शनासाठी येत होता.आज मात्र नंदूचा मृतदेह मंदीरातील पिंडीवर आढळून आल्याने नंदूच्या परिवाराला मोठा धक्का बसला आहे. नंदु घुंघासे या युवकाचा मृतदेह ज्या अवस्थेत महादेवाच्या पिंडीवर आढळून आला ते पाहता अघोरी अंधश्रद्धेतून हत्या किंवा आत्महत्या झाली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

पोलीसांनी वर्तविला आत्महत्येचा अंदाज..

कहारवाडा पैठण येथील युवक नंदू घुंगासे याने गंगेश्वर महादेव मंदिरात आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी गळ्यावर झालेले वार लक्षात घेता असे मत व्यक्त केले असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद