शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी मेडिकल स्टोअरच्या एजंटांची घाटी रुग्णालयात भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 14:52 IST

शासकीय रुग्णालयात स्वस्त औषधी मिळतात का?

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांना आधारवड ठरणाऱ्या घाटी रुग्णालयात जन औषधी केंद्र असून, याठिकाणी औषधींच्या किमतीवर कमीत कमी ५ टक्के आणि जास्तीत जास्त ८० टक्के सूट दिली जात आहे. या केंद्रापेक्षा स्वस्त औषधी दिली जाईल, असे सांगत खासगी मेडिकल स्टोअरचे एजंट घाटीत घुसखोरी करीत असल्याचीही परिस्थिती आहे.

राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत २४ तास जेनेरिक औषधी मिळणार असा निर्णय मागील वर्षी घेण्यात आला होता. त्यानुसार घाटीत जन औषधी केंद्र सुरू करण्यात आले आहे. घाटीत गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना औषधी चिठ्ठ्या देणे बंद करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे औषधी दुकानांवर जाणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी झाल्याची स्थिती आहे.

शासकीय रुग्णालयात जेनेरिक औषधींचा जीआरशासनाने प्रत्येक शासकीय रुग्णालयात जेनेरिक औषधी मिळतील, यादृष्टीने निर्णय घेतला. त्यानुसार घाटी रुग्णालयात जन औषधी केंद्र सुरू करण्यात आले.

८० टक्क्यांपर्यंत स्वस्त; २४ तास सेवाघाटीतील जन औषधी केंद्रावर औषधींच्या ‘एमआरपी’वर ८० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. म्हणजे रुग्णांना ८९ टक्क्यांपर्यंत औषधी स्वस्त मिळतात. हे केंद्र २४ तास सुरू असते.

‘लोकमत’ने काय पाहिले?जेनेरिक औषधी, ...तर ब्रँडेड : रुग्णांना जेनेरिक औषधी देण्यावर भर दिला जातो. ज्या औषधीला जेनेरिकचा पर्याय नाही, अशांनाच ब्रँडेड औषधी दिली जातात.

बिलात सवलत नमूद : रुग्णांना औषधीच्या ‘एमआरपी’वर किती सूट मिळाली, हे बिलामध्ये नमूद केले जात असल्याचे पाहायला मिळाले.२४ तास सुरू : घाटीतील जन औषधी केंद्र हे २४ तास सुरू असते.

९५ टक्क्यांवर चिठ्ठीमुक्तघाटी रुग्णालय जवळपास ९५ टक्क्यांवर चिठ्ठीमुक्त झाले आहे. बाहेरून औषधी आणण्यासाठी चिठ्ठी लिहून देणे आता थांबले आहे. जन औषधी केंद्र ही शासनाची योजना आहे. याठिकाणी ‘एमआरपी’वर ५ टक्क्यांपर्यंत सूट देणे बंधनकारक आहे.- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल