शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फेर नोंदीसाठी तलाठ्याच्या नावाने ५ हजाराची लाच घेताना एजंटला रंगेहात पकडले

By बापू सोळुंके | Updated: May 5, 2025 18:48 IST

ही कारवाई छत्रपती संभाजीनगरजवळील गांधेली येथील तलाठी सज्जा येथे करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर: दोन भूखंडाचा महसूल दप्तरी फेर नोंद घेण्यासाठी तलाठ्याच्या नावाने पाच हजार रुपये लाच घेताना एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सापळा रुचून रंगेहात पकडले. ही कारवाई गांधेली येथील तलाठी सज्जा येथे करण्यात आली. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

देविदास भाऊराव बकाल (५२,रा.मयुरपार्क) आणि तलाठी विनोद शेषराव मुळे (४९) अशी आरोपींची नावे आहेत.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त माहितीनुसार तक्रारदार महिलेच्या पतीच्या नावे गांधेली शिवारात भूखंड आहेत. गट नंबर १३३ मध्ये भूखंड क्रमांक ४० आणि ४१ चे फेर घेण्यासाठी त्यांनी गांधेली तलाठी सज्जा कार्यालय येथे अर्ज दिला होता. एक महिना झाला तरी या फेरची नोंद तलाठी मुळे यांनी घेतली नसल्याचे तक्रारदार यांना समजले. यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. तलाठी मुळे आणि एजंट बकाल हे लाचेची मागणी करीत असल्याचे तक्रारीत नमूद केले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंच पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा देविदास बकाल यांनी तलाठी विनोद मुळे यांच्यासाठी आणि स्वत:साठी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. 

लाच घेताना रंगेहात पकडलेदरम्यान, ५ मे रोजी देविदास बकाल याने तक्रारदार महिलेकडून पाच हजार रुपये लाच घेतली. याचवेळी दबा धरुन बसलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी बकाल यास लाचेच्या रक्कमेसह रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शांतीलाल चव्हाण, हवालदार रविंद्र काळे, अशोक नागरगोजे  यांनी  केली.

प्रत्येक तलाठ्याकडे झिरो तलाठीप्रत्येक तलाठी कार्यालयात झिरो तलाठी म्हणून खाजगी व्यक्ती काम करताना दिसतात. हा खाजगी व्यक्ती तलाठ्याचे दप्तरही सांभाळतो. सामान्य नागरीकांची कामे करण्यासाठी तलाठ्याच्या नावाने पैसेही घेतो. जे पैसे देतील त्यांचीच कामे तातडीने मार्गी लागतात. असाच प्रकार या गांधेली सज्जा येथे सुरू असताना ही कारवाई झाल्याचे एसीबीकडून समजले.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर