शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अबब..! वय अवघे ३२, वजन तब्बल १६६ किलो; सरकारी रुग्णालयातील सर्जरीने वाचले प्राण

By संतोष हिरेमठ | Updated: June 2, 2023 16:46 IST

हर्नियाची गुंतागुंत शस्त्रक्रिया यशस्वी; शस्त्रक्रियेसाठी जोडले दोन ‘ओटी’ टेबल

छत्रपती संभाजीनगर : तिचे वय अवघे ३२ वर्षे. वजन तब्बल १६६ किलो. अशा अवस्थेत तिच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया ओढावली. गुंतागुंत अवस्थेमुळे खासगी रुग्णालयांनी शस्त्रक्रियेसाठी नकार दिला; परंतु, छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) डाॅक्टरांनी हे आव्हान स्विकारले आणि तिची हर्नियाची शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखविण्याची किमया केली.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय आणि १६६ किलो वजन असलेली महिला २७ मे रोजी गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालयातील अपघात विभागात दाखल झाली. सोबत नातेवाइक होते. तिच्यावर हर्नियाची (एपिगॅस्ट्रिक हर्निया) शस्त्रक्रिया करणे गरजेची होती; परंतु, अतिलठ्ठपणा, हायपोथायरॉइडीझममुळे शस्त्रक्रिया करणे अवघड आणि काहीसे धोकादायक होते. कारण अशा अवस्थेत शस्त्रक्रियेसाठी भूल दिल्यानंतर रुग्ण भुलीतून लवकर परत येत नाही. शिवाय शस्त्रक्रियेनंतर रक्ताची गाठ होणे, न्यूमोनिया, टाके तुटण्याची भीतीही होती. ही सगळी आव्हाने स्विकारून घाटीतील शल्यचिकित्साशास्त्र विभागाने २९ मे रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केली. शस्त्रक्रियेसाठी असलेले ओटी टेबल हे सामान्य व्यक्तीच्या दृष्टीने असतात. त्यामुळे दोन ओटी टेबल जोडून त्यावर रुग्णाची शस्त्रक्रिया करण्यात आली.

अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. विजय कल्याणकर, शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख डाॅ. सरोजनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. जुनेद शेख, डाॅ. आरीफ काझी यांनी शस्त्रक्रिया केली. भूलतज्ज्ञ डाॅ. रश्मी बंगाली, डाॅ. ज्योती कुलकर्णी, डाॅ. अश्विनी सोनटक्के यांनी भूल दिली. निवासी डाॅक्टर डाॅ. विनोद परमार, डाॅ. रजनिकांत किडे, डाॅ. चेताली मुरंबीकर, डाॅ. अर्पीत अग्रवाल, डाॅ. अर्कम अन्सारी, डाॅ. मधुसूदन पतारु, डाॅ. रोहिणी बोडगिरे, ब्रदर रवी भोखरे, माधव कांबळे, अमीन शेख यांनी सहकार्य केले.

मोठ्या आकाराची ट्राॅली, मोठ्या आकाराची सुई अन्...- रुग्णाचा रक्तदाब पाहण्यासाठी मोठ्या आकाराचा ‘बीपी कफ’ मशीन मागविण्यात आले.- रुग्णाला वाॅर्डातून शस्त्रक्रियागारात हलविण्यासाठी आणि परत वाॅर्डात आणण्यासाठी मोठ्या आकाराची ट्राॅली मागविण्यात आली.- रुग्णाच्या पाठीत भुलीचे इंजेक्शन देण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त लांबीची सुई मागविण्यात आली.- शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला आयसीयूत ठेवून सतत देखभाल केल्याने सर्व आव्हानांवर मात करणे सोपे झाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य