शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेपाठोपाठ ‘एस. टी.’ चेही विद्युतीकरण, औरंगाबादला मिळणार १०६ ई-बस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 15:12 IST

विभाग नियंत्रक कार्यालयानंतर आता सिडको बसस्थानकात चार्जिंग स्टेशन

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : नव्या वर्षात औरंगाबादहून विजेवर रेल्वे धावणार आहे. त्यादृष्टीने रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वेबरोबर ‘ एस.टी. ’चे ही जणू विद्युतीकरण होणार आहे. एस.टी. महामंडळाच्या औरंगाबाद विभागाला जवळपास १०६ ई-बस देण्याचे नियोजन सुरू आहे.

आजघडीला विभाग नियंत्रक कार्यालयाच्या आवारातील ‘ एस.टी.’ च्या चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता सिडको बसस्थानकाच्या जागेतही चार्जिंग स्टेशन साकारण्यात येणार आहे. डिझेल ऐवजी विजेवर चालणारी ‘ लालपरी ’ लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. डिझेलची सतत होणारी दरवाढ आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या खर्चामुळे एस.टी. महामंडळाने इलेक्ट्रिक बसेस आणण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या वर्धापन दिनी पुणे-नगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आली. एस.टी. महामंडळाच्या औरंगाबाद विभागातही लवकरच इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे. त्यासाठी भाग्यनगर परिसरातील ‘एस.टी.’ च्या विभाग नियंत्रक कार्यालयाच्या पाठीमागील जागेत चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. औरंगाबादला जवळपास १०६ ई-बस मिळणार असून, या बसेस कोणकोणत्या मार्गावर धावतील, यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर नियोजन सुरू असल्याचे एस.टी. महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पर्यटन क्षेत्रात कार्यरत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची दोन दिवसांपूर्वीच ऑनलाइन बैठक झाली. त्यात ‘ एमटीडीसी ’ च्या अधिकाऱ्यांनी एमटीडीसीकडून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांवर प्रकाश टाकत अजिंठा येथे पर्यावरणपूरक बससेवा चालविण्याचे आश्वासन दिले. सोयगाव आगारात आणि लेणी ते फर्दापूर टी पॉइंट मार्गावरही चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासंदर्भात मुंबईत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल.

चार्जिंग स्टेशन प्रस्तावितसिडको बसस्थानकातही चार्जिंग स्टेशन प्रस्तावित आहे. अजिंठा लेणीसाठी सध्या डिझेल बस चालविण्यात येत आहे. येथे ई-बस चालविण्याची मागणी आहे. त्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही केली जाईल.- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक

-जिल्ह्यात सध्या एस.टी. बस-५३६-चार्जिंग स्टेशनवर एकाचवेळी १० बसच्या चार्जिंगची व्यवस्था.- दीड तासांत एक बसची चार्जिंग पूर्ण.- एकदा चार्ज केल्यानंतर ई-बस धावेल ३०० किमी.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरtourismपर्यटन