शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

स्थानिक नेतृत्वामुळे सेनेच्या बालेकिल्ल्यात अस्वस्थता? रेकॉर्डब्रेक सभेनंतरही आमदारांचे बंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 13:14 IST

मंत्रिपद, आमदार असतानाही औरंगाबाद जिल्ह्यात स्थानिक नेतृत्वाकडून सापत्न वागणूक मिळत होती

औरंगाबाद : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ६ आमदार निवडून आले. त्यातील संदीपान भूमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद, तर अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले. यानंतरही अन्य ३ आमदारांसह त्यांनी बंड का केले? यावर आता स्थानिक पातळीवर वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. स्थानिक नेतृत्व याला कारणीभूत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. औरंगाबाद जिल्ह्याला अनेक वर्षांनंतर दोन मंत्रिपदे शिवसेनेच्या निमित्ताने मिळाली. विकासकामांचा धूमधडाका शिवसेनेने सुरू केला. पालकमंत्री सुभाष देसाई विकासकामांवर बारकाईने लक्ष ठेवत असत. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक मंगळवारी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा रोवला. त्यांच्यासोबत औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदार असल्याची एकच चर्चा सुरू झाली. संदीपान भूमरे, प्रदीप जैस्वाल यांच्याबद्दल सर्वाधिक आश्चर्य व्यक्त केले जात होते. नेमकी ही परिस्थिती का निर्माण झाली, यासंदर्भात ‘लोकमत’ने सेनेत कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आल्या. मंत्रिपद, आमदार असतानाही औरंगाबाद जिल्ह्यात स्थानिक नेतृत्वाकडून सापत्न वागणूक मिळत होती. योग्य मान- सन्मान कधीच मिळाला नाही. पक्षाचा मोठा कार्यक्रम असताना व्यासपीठावर तर जागा मिळत होती, पण कार्यक्रम आ. अंबादास दानवे हायजॅक करीत होते.

ही आहेत कारणे...ज्येष्ठ शिवसैनिकांनी सांगितले की, क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमात स्थानिक आमदारांना अजिबात महत्त्व दिले गेले नाही. दानवे यांनीच सर्व कार्यक्रमावर अधिराज्य गाजवले. आणखी एक उदाहरण द्यायचे झाल्यास ८ जून रोजी सांस्कृतिक मंडळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित केली होती. या सभेतही दानवे यांनी माईकचा ताबा सोडला नाही. त्यामुळेही सेना आमदारांची नाराजी बरीच वाढली होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाSanjay Shirsatसंजय शिरसाटAbdul Sattarअब्दुल सत्तारSandeepan Bhoomraसंदीपान भुमरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ