शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
3
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
4
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
5
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
6
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
7
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
8
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
9
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
10
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
11
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
12
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
13
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
14
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
15
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
16
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
17
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
18
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
19
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
20
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
Daily Top 2Weekly Top 5

आता पॅनल नावालाच; विरोधी पक्षांची ट्यूनिंग करून काही प्रभागांत उमेदवारांचे एकला चलो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 13:55 IST

काही प्रभागांत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारासोबत ट्युनिंग सेट करीत आपली सीट काढून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

- मुजीब देवणीकरछत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात मागील दोन दिवसांपासून प्रचाराचा जोर चांगलाच वाढला आहे. प्रभाग पद्धतीच्या या निवडणुकीत एकाच पक्षाच्या चार, तर काही ठिकाणी तीन उमेदवारांच्या पॅनलचा आपसांत ताळमेळ जुळणे अवघड जाते आहे. त्यामुळे प्रभागातील सक्षम उमेदवाराने आता ‘एकला चलो रे’ची भूमिका स्वीकारली आहे. कमकुवत उमेदवारामुळे आपण पराभवाच्या खाईत का पडावे? या भावनेतून काही उमेदवारांनी वैयक्तिक प्रचारावर अधिक भर दिला आहे. काही प्रभागांत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी विरोधी पक्षाच्या उमेदवारासोबत ट्युनिंग सेट करीत आपली सीट काढून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

प्रचारासाठी उमेदवारांकडे आता फक्त ७ दिवसांतील मोजून १६८ तास प्रचारासाठी शिल्लक आहेत. निवडणूक रिंगणात ८५९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. त्यात राजकीय पक्षाच्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. सर्वच राजकीय पक्ष ही निवडणूक स्वबळावर लढवत आहेत. सुरुवातीला राजकीय पक्षाच्या पॅनलमधील सर्व उमेदवार एकदिलाने प्रचाराला बाहेर पडत होते. काही उमेदवारांना मतदारांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पॅनलमधील काही प्रमुख उमेदवारांनी आपल्या अन्य उमेदवारांना सोडून प्रचार सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

प्रचार, प्रसार एकट्याचाप्रभागातील जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार उपलब्ध विविध साधनांचा वापर करीत आहेत. यामध्ये पक्षाच्या चारही उमेदवारांनी एकत्रित मतदारांपर्यंत पोहोचणे पक्षाला अपेक्षित आहे. अनेक ठिकाणी असे होताना दिसून येत नाही. आर्थिक बाबीवरून ताणाताणीचे प्रसंग उद्भवत आहेत, अशी चर्चाही कानी येते. अंतर्गत वाद, पैशांची चणचण आदी अनेक कारणांमुळे काहींनी पक्षातील अन्य उमेदवारांची साथ जवळपास सोडली आहे. राजकीय पक्षांप्रमाणे उमेदवारही प्रभागात स्वबळावर पुढे जात आहेत.

विरोधी पक्षासोबत सेटिंगएकाच प्रभागात दोन वेगवेगळ्या पक्षांकडून सक्षम उमेदवार आहेत. मात्र, ते दुसऱ्या प्रवर्गात असल्याने त्यांनी आपसात सेटिंग करून घेतल्याची चर्चाही जोर धरायला लागली आहे. ‘तुम्ही आम्हाला- आम्ही तुम्हाला’ मदत करू असे धोरण स्विकारल्याची चर्चा आहे. निवडणूक निकालानंतरच या बाबी समोर येतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Panel unity crumbles as candidates in some wards embrace solo campaigns.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar elections see panel discord. Candidates prioritize individual campaigns due to weak allies and financial strains. Some even collaborate with rivals, signaling shifting dynamics and strategic alliances within wards.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६