शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

आग लागल्यानंतर श्वानाच्या भुंकण्याने जाग आली; झाडावरून उड्या मारल्याने ९ कामगार बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 16:40 IST

उद्योगनगरीतील सनशाईन एंटरप्रायजेस कंपनीला भीषण आग, सहा कामगारांचा होरपळून

वाळुजमहानगर : वाळूज उद्योगनगरीतील कॉटन व लेदरचे हॅण्डग्लोव्हज व साहित्य बनविणाऱ्या सनशाईन एंटरप्रायजेस (प्लॉट नं. सी-२१६) या कंपनीला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कंपनीत अडकलेल्या सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर एका चिमुकल्यासह नऊ कामगार या आगीतून बचावले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वाळूज उद्योगनगरीत साबेरखान शब्बीरखान पठाण (रा. बायजीपुरा) यांची सनशाईन एंटरप्रायजेस या नावाची कंपनी आहे. या कंपनीत कॉटन व लेदरचे हातमोजे तसेच इतर साहित्य बनविण्याचे काम केले जाते. हसीनोमुद्दीन मुस्ताक शेख (४०, रा. डलौखर, ता. मिर्जापूर, जि. मधुबनी, बिहार) हे ठेकेदार असून ते कुटुंबासह कंपनीत वास्तव्यास होते. कंपनीत त्यांच्यासह १४ कामगार काम करतात. शनिवारी मध्यरात्री रात्री एक वाजेच्या सुमारास आग लागली होती. सुरुवातीला कंपनीत असलेल्या श्वानाने मोठ-मोठ्याने भुंकण्यास सुरुवात केल्याने ठेकेदार हसीनोमुद्दीन यांची पत्नी इस्मतजहॉं शेख (३६) ही झोपेतून जागी झाली. प्रसंगावधान राखत इस्मतजहॉं यांनी आरडा-ओरडा केल्याने कंपनीच्या वरच्या मजल्यावरील रूममध्ये झोपलेले कामगार जागे झाले. मात्र, क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. सर्व कामगार कंपनीत अडकून बसले होते. या कामगारांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. बाजूच्या हीना इंडस्ट्रीज या कंपनीत काम करणारे गंगाधर कदम, प्रदीप मौर्य, कंपनी मालक इम्रान पठाण, फिरोज पठाण यांनी तत्काळ मदतीसाठी आले. मात्र, कंपनीचे लोखंडी प्रवेशद्वार व शटर बंद होते. यानंतर गंगाधर कदम व प्रदीप मोर्य या दोघांनी दुचाकीवर जाऊन वाळूज अग्निशमन दल व एमआयडीसी वाळूज पोलिसांनी कंपनीला आग लागल्याची माहिती दिली.

कामगारांनी झाडावर चढून उड्या घेत वाचवला जीवकंपनीतील रूममध्ये झोपलेल्या दिलीपकुमार चंद्रिका मंडल (२४), मो. दिनारुल मो. एहरार (२०), मो. अफरोज मो. शोएब (२३), मो. हैदर अली (३२), मो. इरशाद जफरोद्दीन आलम या ५ कामगारांनी प्रसंगावधान राखत कंपनी कपाउंडलगत असलेल्या झाडावर चढले. झाडावरून उड्या घेत स्वत:चा जीव वाचवला. घटनास्थळी मदतीसाठी आलेल्या एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व परिसरातील नागरिकांनी ठेकेदार हसिनोद्दीन शेख याने पत्नी इस्मतजहॉं (३२), मुलगा मुज्जमील शेख (५) व मुलगी आयशा (दीड वर्ष) यांना बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. मात्र हसिनोद्दीन शेख यांचे वडील मो. मुस्ताक मो. इब्राहिम (६२), कोशर आलम जफरुद्दीन (३७), मो. इक्बाल मो. एहरार (१७), रामलाल रामविलास सिंदरिया (४६), मो. मार्गब आलम सहाबुद्दीन (३२, सर्व रा. बिहार) व रियाज बशीर सय्यद (२५, रा. रोषनगाव, ता. बदनापूर) हे धुरामुळे गुदमरून बेशुद्ध पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत या बेशुद्ध पडलेल्या कामगारांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले.

अग्निशमन विभाग व पोलिसांची मदतअग्निशमन दलाचे जवान तसेच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक अविनाश आघाव, पोलिस निरीक्षक गणेश ताठे, सहा. निरीक्षक गौतम वावळे, उपनिरीक्षक दीपक रोठे, सचिन पागोटे, राहुल निर्वळ, पोहेकॉ. अभिमन्यू सानप, पोना. नवाब शेख, पोकॉ. हनुमान ठोके, नितीन इनामे, विक्रम वाघ, योगेश शेळके, राजाभाऊ कोल्हे आदींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. वाळूज अग्निशमन दल व मनपाचे प्रत्येकी २, बजाज ऑटो व चिकलठाणा अग्निशमन दलाचा १ अशा एकूण ६ बंबानी पहाटे ३.३० वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत होरपळलेल्या ६ कामगारांना १०८ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले.

पोलिस आयुक्तांकडून घटनास्थळाची पाहणीरविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावलेल्या कामगारांकडून घटनेची माहिती जाणून घेत तपासासंदर्भात विविध सूचना दिल्या. याप्रसंगी पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक आयुक्त महेंद्र देशमुख आदींची उपस्थिती होती. या घटनेची माहिती मिळताच औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, कंपन्याचे अधिकारी यांनीही घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली. याप्रकरणी उपनिरीक्षक राहुल निर्वळ यांच्या फिर्यादीवरून कंपनी मालक साबेरखान शब्बीरखान पठाण (रा. न्यु बायजीपुरा) व ठेकेदार मो. हसिनोमुद्दीन मो. मुस्ताक या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक गणेश ताठे करीत आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादfireआगWaluj MIDCवाळूज एमआयडीसी