शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमविवाहनंतर सासरच्यांनी छळले, माहेरच्यांनी साथ सोडली; उड्डाणपुलावरून विवाहितेची उडी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:11 IST

विवाहितेचा उड्डाणपुलावरून जीवन संपविण्याचा प्रयत्न, प्रत्यक्षदर्शींनी धाव घेत वाचविले प्राण

छत्रपती संभाजीनगर : प्रेमात सुखी संसाराच्या आणाभाका घेत आकांक्षा (नाव बदलले आहे)ने प्रियकरासोबत लग्न केेले. मात्र, काही दिवसांत सासरच्यांकडून छळ सुरू झाला. तिच्या सततच्या तक्रारीला कंटाळून माहेरच्यांनी साथ सोडली. अखेर, एकट्या पडलेल्या २७ वर्षीय आकांक्षाने बुधवारी दुपारी एक वाजता भगवान महावीर चौकातील (बाबा चौक) उड्डाणपुलावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. स्थानिकांनी धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केल्याने तिचा जीव वाचला.

आकांक्षाने चार वर्षांपूर्वी हसनाबादमधील तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला संसार सुरळीत चालला. त्यांना एक गोंडस मुलगाही झाला. मात्र, काही दिवसांतच नवरा आणि सासरकडून तिला मानसिक त्रास दिला जाऊ लागला. सतत मारहाण, वाद घालून टोमणे मारले जात होते. सासरच्यांच्या या वागणुकीला पतीकडून मिळणारी साथ आकांक्षाला असह्य झाली होती. अनेकदा तिने मदतीसाठी माहेरी धाव घेतली. मात्र, पतीच्या वागण्यात बदल झाला नाही.

दरम्यान, पतीने मुलाला स्वत:कडे ठेवत आकांक्षाशी संवाद कमी केला. त्यामुळे आकांक्षा अधिकच तणावाखाली गेली. त्रास असह्य झाल्याने बुधवारी दुपारी थेट महावीर चौकातील उड्डाणपुल गाठत तेथून खाली उडी मारली. या घटनेत तिच्या डोके, हात व पायांना गंभीर इजा झाली आहे. तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघात