शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गॅसचा पाइप किती दिवसांनी बदलायला हवा ? जाणून घ्या वायसर, रेग्युलेटर कसे तपासणार

By प्रशांत तेलवाडकर | Updated: November 3, 2023 12:05 IST

गाफील न राहता सिलिंडरची संपूर्ण तपासणी नियमित करावी

छत्रपती संभाजीनगर : घरगुती गॅसचा स्फोट, सिलिंडर पाइपातून गॅस लिकेज होऊन घडली दुर्घटना, अशा बातम्या अधूनमधून वर्तमानपत्रात वाचण्यास मिळतात. अशी घटना कोणाच्याही घरात घडू शकते. यासाठी गॅस सिलिंडरचे वायसर व पाइप चेक करणे आवश्यक आहे.एका सिलिंडरचे आयुष्य साधारणत : १५ वर्षांचे असते, तसेच गॅसच्या पाइपचे (नळी) आयुष्यही ठरलेले असते. सिलिंडर रेग्युलेटरला केशरी रंगाची सुरक्षा होज गॅस पाइप लावलेला असेल तर दर ५ वर्षांनी पाइप बदलावा. जर साधी रबरी नळी लावलेली असेल तर दरवर्षी बदलावी.

वायसर चेक कसे करावे ?गॅसचा वास येऊ लागला की, पहिले सिलिंडरच्या वायसरची तपासणी करावी. तुम्ही दोन ते तीन थेंब पाणी टाकल्यास बुडबुडे आल्यास वायसरमधून गळती होत आहे, असे गृहित धरावे. शक्यतो जेव्हा गॅस एजन्सीमधून सिलिंडर आपल्या घरी येते तेव्हा त्याच कर्मचाऱ्याकडून सिलिंडर वायसरची तपासणी करून घ्यावी व वायसर चांगले आहे याची खात्री करून घ्यावी.

रेग्युलेटर चेक कसे करावे ?अनेकांना रेग्युलेटरची कशी तपासणी करावी हे माहीत नसते. रेग्युलेटर सिलिंडरला वरतून प्रेशर देत लावले जाते. त्यानंतर बटन फिरवून व लायटरने शेगडी लावून व्यवस्थित गॅस पुरवठा होतो का हे पाहावे. गॅसचा वास येत असल्यास ते रेग्युलेटर पुन्हा काढून व्यवस्थित लावावे. रेग्युलेटरच्या चोहीबाजूने हात लावावा, बोटाला हवेसारखा स्पर्श झाल्यास, ते रेग्युलेटर पुन्हा काढून व्यवस्थित लावावे. गॅस गळती होत असल्यास गॅस एजन्सीला फोन लावावा.

गॅसबाबत काय काळजी घ्यालदरवर्षी गॅस सिलिंडरची तपासणी करून घ्यावी, तसेच शेगडीची, वायसर, पाइपची तपासणी करून घ्यावी. गाफील राहू नये. स्वयंपाकाचे काम संपले की, रेग्युलेटरचे बटण बंद करून ठेवावे. गॅस एजन्सीला फोन करून नियुक्त प्रशिक्षित कर्मचाऱ्यामार्फत तपासणी करणे सर्वांत योग्य आहे.

गाफील न राहता सिलिंडरची तपासणी करावीजेव्हा गॅस गळती होते तेव्हाच ग्राहकांना त्याचे गांभीर्य कळते. दुर्घटना घडल्यावर खबरदारी घेण्यापेक्षा दुर्घटना घडूच नये यासाठी सतत खबरदारी घेणे आवश्यक आहे. सिलिंडरचे वायसर असो, रेग्युलेटर असो किंवा पाइप शक्यतो गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करून घ्यावी. -मिथुन व्यास, गॅस एजन्सी मालक

प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच बोलवाअप्रमाणित रबरी नळी, शेगडी वापरू नका. गॅस एजन्सीमधूनच शेगडी खरेदी करा, तसेच केशरी रंगाच्या सुरक्षा एलपीजी होज गॅस पाइपचाच नेहमी वापर करावा. कारण, हा पाइप एकदा लावल्यावर दर पाच वर्षांनी तो बदलावा. हलका रबरी पाइप वापरू नये.- मंगेश आसावा,गॅस एजन्सी मालक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHomeसुंदर गृहनियोजन